नांदेड : कोलंबी शिवारातून बैलजोडी चोरणाऱ्या चोरट्याला अटक

बैलांना इंजेक्शन देऊन बैलजोडी चोरून नेली
Nanded bullock theft
बैलांना इंजेक्शन देऊन बैलजोडी चोरून नेली
Published on
Updated on

नायगांव : कोलंबी शिवारात असलेल्या आखाड्यावरील बैलांना इंजेक्शन देऊन बैलजोडी पंधरा दिवसापुर्वी चोरीला गेली होती. याप्रकरणी तपास करत नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने चोरट्याला अटक केली. आब्दुल कलाम आब्दुल सतातर (वय २२, रा. देगलूर नाका नांदेड) असे चोरट्याचे नाव आहे. त्याला नायगांव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्याकडून इतर ठिकाणच्याही जनावरे चोरीच्या घटनांची उकल होण्याची शक्यता आहे.

Nanded bullock theft
धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर महाविद्यालय आवारातच अत्याचार; दोघांना अटक

कोलंबी गावाच्या बाहेर काहाळा ते गडगा जाणाऱ्या रोडलगत माजी सरपंच हणमंत पोतलवाड यांची शेती आहे. रस्त्या लागत गुरे ढोरे बांधण्याचा आखाडा असून त्या ठिकाणी पोतलवाड हे गाय, बैल, म्हैस बांधत असत. या आखाड्यावर ते किंवी त्यांचे भाऊ रात्रीला मुक्कामी राहत होते. १३ सप्टेंबर रोजी हणमंतराव व भाऊ किशन रघुनाथ पोतलवाड अशोक रघुनाथ पोतलवाड असे दिवसभर शेतात काम केले. त्यानंतर जनावरांना सायंकाळी सहाच्या सुमारास शेतातील आखाड्यावर बांधले. त्यानंतर यातील दोन बैल चोरीला गेले होते. त्या प्रकरणी नायगांव पोलीस ठाण्यात आज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नांदेड स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीसांनी आरोपी आब्दुल कलाम आब्दुल सतातर( वय २२) रा.हीलाल नगर देगलूर नाका नांदेड यांना ताब्यात घेतले आसता त्याने नायगांव हद्दीतील कोंलबी शिवरातील बैलजोडी चोरल्याची कबुली दिली.

Nanded bullock theft
भाडेकरु तरुणीच्या बाथरुम-बेडरुममध्ये छुपे कॅमेरे; घरमालकाच्या मुलाला अटक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news