नांदेड : पुढारी वृत्तसेवा
नायगाव तालुक्यातील कोकलेगाव शिवारात कूंटूर पोलिसानी तर आंचोली शिवारात विशेष पथकाने जुगार अड्ड्यावर (शनिवार) धाड टाकली. यामध्ये कोकलेगावात ११ जुगाऱ्यांवर तर आंचोलित ८ जनांवर गुन्हा नोंदविला आहे.
कोकलेगाव जुगार अड्ड्यावरील कारवाईत फक्त १४ हजारांची रक्कम जप्त करण्यात आल्याने ही कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या विषयी नायगाव तालुक्यात उलट सुलट चर्चा होत आहेत. विशेष पथक येणार कळताच रामकृष्ण साहेबांनी आपली बुध्दी लढवत धाड टाकली. पण केवळ चौदा हजार रुपयेच पकडल्याने या धाडीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे?
ज्या ठिकाणी जुगार चालू होता त्या ठिकाणी एक ही वाहन नव्हते का? जुगार खेळणाऱ्या आकरा जनांजवळ एवढेच पैसे कसे? असे अनेक निरुत्तर राहणारे प्रश्न समोर येत आहेत.
या कारवाईत नारायण बालाजी कदम, हनुमंत पांडुरंग मिरकुटे, संतोष किशन पालनवार, गोविंद यशवंत सोळुंके, अनिल आनंदराव शिंदे, सुनील उत्तम हनुमंते, साहेबराव सटवा पदीलवाड, साईराज रामकिशन कदम, सचिन पांडुरंग शेळगावे, चंद्रकांत मारुती हळदेवाड, श्याम वसंत खदके अशा एकूण अकरा जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अंचोली शिवारात जुगार चालू असल्याची गुप्त माहिती मिळताच मोबाइल लोकेशनवरुन विशेष पथकाने धाड मारुन आठ जुगाऱ्यांना पकडले. रोख रक्कमेसह मोटारसायकल व कार असा एकुण ७ लाख 28 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई दि. २८ रोजी सायंकाळी करण्यात आली.
अंचोली ते रानसुगाव पांदन रस्त्यावर राजू मोरे यांच्या शेताजवळ लिंबाच्या झाडाखाली गजानन किशनराव, यादव महाजन पल्लेवाड रा. गोदमगाव, गंगाधर गुनाजी मेघळ रा. कहाळा, शेख रफीयोद्दीन लियाकत रा. कहाळा, शादूल मौलासाब शेख नरसी, दामाजी विठ्ठल पेंटेवाड रा. लालवंडी, सय्यद फिरोज करीमसाब रा. नायगाव व मोहन प्रकाश कदम रा. गोदमगाव हे ८ जण जुगार खेळताना पकडले गेले.
रोख १४ हजार ५०० रुपयांसह मोबाईल, दुचाकी व कार असा एकूण ७ लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक आनंद वाघमारे यांच्या फिर्यादीवरुन नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.