Kinwat Crime: पैशांवरून वाद, अनैतिक संबंधांची किनार...अंगठीवरून मृतदेहाची ओळख; किनवटच्या विनोदची हत्याच, मारेकरी कोण?

Nanded crime news: घर विक्रीच्या पैशांवरून वाढले वाद, दीड महिन्यानंतर उघडकीस आले भयावह सत्य
Nanded crime news
Nanded crime newsPudhari
Published on
Updated on

Kinwat Todays Crime News:

किनवट : वैवाहिक नात्यातील विश्वासघात आणि अनैतिक संबंधांनी किनवट तालुक्यात पुन्हा एकदा हादरवणारी घटना घडली आहे. मथुरा नगर परिसरातील विनोद किसन भगत (वय 52) या मिस्त्री काम करणाऱ्या पतीचा खून पत्नी प्रियंका विनोद भगत हिने आपला प्रियकर शेख रफिक शेख रशीद यांच्या मदतीने केल्याचे भयावह सत्य दीड महिन्यांच्या तपासानंतर अखेर उघडकीस आले आहे.

घर विक्रीतील पैशाचा वाद ठरला निमित्त

विनोद आणि प्रियंका यांचा विवाह 2003 मध्ये झाला होता. प्रियंका हिने काही महिन्यांपूर्वी प्रियकर शेख रफिकच्या मदतीने विनोद यांच्या नावावर असलेले आरसीसीचे घर तीस लाख रुपयांना विकले होते. मात्र, या विक्रीतील पैशाचा हिशेब न दिल्याने पती-पत्नीमध्ये वारंवार मोठे वाद होत होते. या तणावाबाबत विनोद यांनी आपल्या बहिणींनाही सांगितले होते.

मिसिंग रिपोर्ट आणि संशय

29 ऑगस्टच्या रात्रीपासून विनोद भगत घरी परतले नाहीत. दुसऱ्या दिवशी शोधाशोध करूनही ते न सापडल्याने सुरुवातीला प्रियंका हिनेच 3 सप्टेंबर रोजी किनवट पोलीस ठाण्यात 'मिसिंग रिपोर्ट' दाखल केला. मात्र, विनोद यांच्या बहिणींना प्रियंका आणि शेख रफिक यांच्या अनैतिक संबंधांचा संशय आला. स्थानिक नागरिकांनीही प्रियंका आणि शेख रफिक हे एकत्र येत असल्याची माहिती दिली. या संशयावरून विनोद यांची बहीण नंदा पाटील यांनी 11 ऑक्टोबर रोजी पोलिसांकडे तक्रार दिली.

सीडीआर तपासातून खुनाचे रहस्य उलगडले बहिणीच्या तक्रारीनंतर किनवट पोलिसांनी मोबाईल कॉल रेकॉर्ड (सीडीआर) तपासला असता, प्रियंका आणि प्रियकर शेख रफिक यांच्यात वारंवार संपर्क असल्याचे उघड झाले. पोलिसांनी संशयित शेख फयाज याची कसून चौकशी केली असता, त्याने क्रूर कृत्याचे भयावह सत्य सांगितले.

दारूच्या नशेत पुलावरून ढकलले तपासात उघड झाले की, 29 ऑगस्टच्या रात्री प्रियंका आणि प्रियकर शेख रफिक यांनी दारूच्या नशेत असलेल्या विनोद भगत यांना मोटारसायकलवर बसवून खरबी टी-पॉईंटजवळील पैनगंगा नदीच्या पुलावर नेले. त्यानंतर शेख रफिक याने विनोद यांना थेट पुलावरून खाली पुराच्या पाण्यात ढकलले, ज्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.

अंगठीवरून मृतदेहाची ओळख

या घटनेनंतर महागाव पोलीस ठाण्याच्या मदतीने पोलिसांनी 2 सप्टेंबर रोजी नदीत सापडलेल्या मृतदेहाचे फोटो, कपडे आणि तांब्याची अंगठी नंदा पाटील यांना दाखवली. नंदा पाटील यांनी भावाला दिलेली ती अंगठी ओळखून मृतदेहाची खात्रीपूर्वक ओळख पटवली.

प्रियकरासह पत्नीवर गुन्हा दाखल

याप्रकरणी पोलिसांनी प्रियकर शेख रफिक शेख रशीद (वय 43) आणि पत्नी प्रियंका विनोद भगत (वय 41) या दोघांविरुद्ध खुनासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. नात्यातील विश्वासघाताच्या या भयानक घटनेमुळे किनवट शहरात खळबळ उडाली असून, दोन निरागस मुलांचे जीवन उद्ध्वस्त झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news