नायगाव, पुढारी वृत्तसेवा : नांदेडचे काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांच्या पार्थिवावर तोफेची सलामी देत शासकीय इतमामात आज (दि. २७) दुपारी बारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नांदेड जिल्ह्याचे पालक मंत्री गिरीश महाजन, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आदीसह महाविकास आघाडी, व महायुतीतील अनेक नेते व मोठ्या संख्येने जनसागर उपस्थिती होता.
खा.वसंत चव्हाण यांचे दीर्घ आजाराने सोमवारी पहाटे हैद्राबाद येथे खासगी हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांचे पार्थिव हैद्राबाद- देगलूर मार्गे नायगाव येथे सोमवारी दुपारी दोन ते तीन च्या दरम्यान आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या कडेने नरसी ते नायगाव पर्यंत रांगा लागल्या होत्या. अनेकांनी पुष्पवृष्टी करीत आपल्या लाडक्या नेत्याचे अंत्य दर्शन घेतले. नंतर पार्थिव चव्हाण यांच्या जुन्या वाड्यात ठेवण्यात आले .
आज सकाळी हजारोंच्या जनसमुदायासह नातेवाईक, व्यापारी, पत्रकार, राजकीय कार्यकर्त्यांनी अंत्यदर्शन घेतले. घरापासून जवळच असलेल्या मंदिर परिसरातील चव्हाण परिवाराच्या स्मशान भूमीत अत्यंत कडक पोलीस बंदोबस्तात शासकीय इतमामात अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्यात आली होती. घरापासून निघालेल्या अंत्ययात्रेत हजारोंच्या वर जन समुदाय सहभागी होता.
या वेळी शासनाच्या वतीने पालकमंत्री गिरीश महाजन, तर काँग्रेसच्या वतीने विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार, महाराष्ट्रसह प्रंभारी काँग्रेस संपत कुमार, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, खा. रजनी पाटील, महायुतीकडून माजी मुख्य मंत्री अशोक चव्हाण, भास्करराव पाटील खतगावकर, प्रताप चिखलीकर, आ.मेघनाताई बोर्डीकर, आ.विक्रम काळे, महाविकास आघाडीचे माजी खा.सुभाष वानखेडे, खा. बंडू जाधव, माजी मंत्री कमल किशोर कदम, आ.श्याम शिंदे, प्रा मनोहर धोंडे आदीने श्रध्दांजली वाहिली. वसंत चव्हाण यांचे सुपुत्र प्रा रवींद्र चव्हाण यांनी मान्यवरांचे ऋण व्यक्त केले .
गुरुवर्य महंत श्री १०८ यदुबन महाराज कोलंबी, शिदेश्र्वर महाराज बेटमोग्रा, वे. शां. संपन्न ब्रह्मवृंद आदीच्या प्रमुख उपस्थितीत अंत्यसंस्कार विधी पार पडला. पार्थिवाला भडाग्नी खा.वसंत चव्हाण यांचे पुत्र प्रा. रवींद्र चव्हाण, इंजिनियर रणजित चव्हाण, व वसंत चव्हाण यांच्या बंधूच्या हस्ते देण्यात आला.
या वेळी माजी मंत्री माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, खा. डॉ. अजित गोपछडे, खा. डॉ. कल्याण काळे, खा. डॉ. शिवाजी काळगे, खा.शोभा बचाव, माजी खा हेमंत पाटील, आ.जवळगावकर, आ.बालाजी कल्याणकर, आ. धीरज देशमुख, आ. प्रज्ञा सातव, आ.तुषार राठोड, आ. राजेश पवार, आ.मोहन आणा हंबर्डे, आ.जितेश आंतापुरकर, माजी आमदार सुरेश जेथलिया , नानासाहेब जावळे, माजी मंत्री सुर्यकांता पाटील, देविदास राठोड, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, माजी मंत्री डी.पी सावंत, माजी मंत्री किन्हाळकर, श्याम दरक, माजी आ. राम पाटील रातोळीकर, हणमंत बेटमोग्रेकर, ओमप्रकाश पोकर्णा, सुभाष साबणे, रोहिदास चव्हाण, माधवराव पाटील शेळगावकर, माजी आ.अमर राजुरकर, राजेश देशमुख.
सुरेश गायकवाड, प्रणिता देवरे, दिलीप धर्माधिकारी, एकनाथ मोरे, कामाजी पवार, हंसराज बोरगावकर, श्रावण पा. भिलवंडे, शिवराज पा. होटाळकर, बालाजी बचेवार, मारोतराव कवळे, राजेश कुंटूरकर, कैलास गोरठेकर, यशपाल भिंगे, भगवान पा.आलेगावकर, एकनाथ पवार, मंघरणी आंबुलगेकर, बालाजी पांडगले, मोहनराव सुगावकर, धोंडू पाटील, भुजंग पाटील, बबन बारसे, दत्ता कोकाटे, पुरुषोत्तम धोंडगे, दिलीप कंदकुर्ते, संजय लहानकर, दिलीप धोंडगे, दिलीप बेटमोग्रेकर, बाळासाहेब रावणगावकर, अब्दुल सत्तार, किशोर भवरे, हरिहर भोसीकर, किशोर स्वामी, भास्कर भिलवंडे, रवींद्र भिलवडे, संभाजी भिलवडे, बाळासाहेब देशमुख, वसंत सुगावे यासह मराठवाडा व विदर्भ, तेलंगणा, आदी ठिकाणचे राजकीय नेते, कार्यकर्ते व जनसमुदाय हजर होता.