

MADC gets license from Union Ministry of Civil Aviation
नांदेड, पुढारी वृत्तसेवा येथील श्री गुरुगोविंदसिंघजी विमानतळ रिलायन्स कंपनीकडून ताब्यात घेतल्यानंतर ते में महिन्यात महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे (एमएडीसी) सोपवण्यात आले. परंतु आता त्याला अधिकृतरित्या केंद्रीय नागरी उड्डूयन मंत्रालयाचा परवाना प्राप्त झाला आहे. याबाबत पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त करताना व्यवस्थापनाने रविवारी (दि. ५) प्रवाशांचे स्वागत केले.
कोविड पासून बंद पडलेले येथील विमानतळ गतवर्षी एप्रिलमध्ये पुन्हा सुरु झाले. परंतु त्याची स्थिती बाईट होती. विशेषतः धावपट्टी धोकादायक बनली होती. या विमानतळाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या रिलायन्स कंपनीने सोयीसुविधांकडे साफ दुर्लक्ष केले होते. त्यामुळे नव्याने विमानसेवा सुरु होतानाच नागरी उड्यन महासंचालनालयाने बरेच आढेवेढे घेतले होते. परंतु नंतर तातडीने सुर क्षेच्या दृष्टीने आवश्यक सोयीसुविधांचे पुनर्निर्माण करण्याच्या अटीवर तात्प रता परवाना देण्यात आला.
दरम्यान, वारंवार सूचना देऊनही रिलायन्स कंपनीने दुर्लक्ष केले. त्यामुळे आणि प्रवाशांकडून होणाऱ्या सततच्या तक्रारीमुळे येथील विमानतळ रिलायन्स कंपनीकडून काढून घेण्यात आले आणि ते मे २०२५ मध्ये महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे सोपवण्यात आले. दि. २० मे रोजी हस्तांतरण सोहळा नांदेड येथेच पार पडला. आता या कंपनीला नागरी उडूयन महासंचालनालयाचा परवाना मिळाला आहे. यामुळे आता विमानतळाचा विकास करणे सुलभ होणार आहे.
मुंबई विमानतळावर स्लॉट उपलब्ध नसल्याचे कारण देत मागील दिड वर्षांपासून नांदेड-मुंबई विमानसेवा सुरु करण्याबाबत असमर्थता दर्शविण्यात येत होती. परंतु आता नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्ण झाले असून येत्या दि. ८ ऑक्टोबरला पंतप्रधानंच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. त्यामुळे आता नांदेड-मुंबई विमानसेवा सुद्धा सुरु होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.