माजी नगराध्यक्ष राम चौधरी विधानसभेच्या आखाड्यात

माजी नगराध्यक्ष राम चौधरी विधानसभेच्या आखाड्यात
Nanded news
माजी नगराध्यक्ष राम चौधरी विधानसभेच्या आखाड्यातpudhari photo
Published on
Updated on

मुदखेड, पुढारी वृत्तसेवा: सध्या विधान सभेच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहात आहेत. अनेक राजकीय पुढारी या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यातच आता भोकर विधान सभेसाठी अनेक गावपुढारी कंबर कसली असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते व सलग १७ वर्षे नगराध्यक्ष राहिलेले राम चौधरी यांनी पण जोरात तयारी सुरू केली असून महाविकास आघाडीकडून उमेदवारीची मागणी केली आहे.

या संदर्भाने राम चौधरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे रीतसर अर्ज करून उमेदवारीची मागणी केली आहे. या संदर्भाने मागील सहा महिन्यात दोनवेळा माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम व माजी मंत्री राजेश टोपे यांच्या माध्यमातून शरद पवार यांची भेट घेतली.

या भेटीत चौधरी यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा लेखाजोखा त्यांच्या समोर ठेवला. शिवाय २००२ च्या नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वतंत्र पॅनल उभे करून तत्कालीन गृहमंत्री कै. आर. आर. पाटील यांची सभा घेतल्याची आठवण पण शरद पवार यांना करून दिली. त्यामुळे शरद पवार गटाला भोकरची जागा सुटल्यास राम चौधरी हेच महाविकास आघाडीचे उमदेवार असतील हे निश्चीत आहे.

राम चौधरी यांचा राजकीय प्रवास, भोकर, मुदखेड व अर्धापूर तालुक्यात असलेला त्यांचा दांडगा जनसंपर्क याबळावर त्यांचा निश्चित निवडून येतील, असे मतदारसंघात चर्चा आहे. आजही या तीन तालुक्यांतील अनेक गावांतील कमीत कमी दहा ते पंधरा कार्यकर्ते राम चौधरी यांच्या संपर्कात असल्याने मात्तब्बर उमेदवाराचा पराभव व्हायला वेळ लागणार नाही, असे मानले जात आहे.

Nanded news
Hariyana Vidhansabha Election : काँग्रेसमध्ये प्रवेश करताच विनेश फोगाट विधानसभेच्या आखाड्यात

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news