माळीकोळी, पुढारी वृत्तसेवा : माळेगाव यात्रेत लावणी महोत्सव घेणारी नांदेड जिल्हा परिषद राज्यातील पहिली जिल्हा परिषद आहे. रसिकांना भुरळ घालणारी व कलावंतांचा मान-सन्मान करणाऱ्या या लावणी महोत्सवासाठी जिल्हा नियोजन समितीमधून १ कोटी देण्याचे आश्वासन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिले.
नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने माळेगाव येथे आयोजित लावणी महोत्सवाचे उद्घाटन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्रवीण साले, परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, अतिरिक्त जिल्हाधिकारी पी.एस. बोरगावकर, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद मंडलिक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेशकुमार मुक्कावार, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, विजय बेतीवार, गट विकास अधिकारी अडेराघो, माजी सभापती आनंदराव पाटील, सरपंच प्रतिनिधी हनुमंत धुळगंडे आदींची उपस्थिती होती.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी प्रास्ताविक केले. तर हनुमंत धुळगंडे यांनी मनोगत व्यक्त केले. परशुराम कौशल्ये यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.
यावेळी रोहित पाटील, नरेंद्र गायकवाड, केशव मुकदम, दत्ता वाले, भगवानराव राठोड, सचिन पाटील चिखलीकर, अनिल बोरगावकर, जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे, उप शिक्षणाधिकारी बंडू अमदूरकर, बालाजी नागमवाड, विस्तार अधिकारी डी. आय. गायकवाड, धनंजय देशपांडे आदीसह पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
हेही वाचा