लातूर - लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघात गेल्यावेळी भाजपाचा विजय निश्चित होता मात्र काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यात छुपा समझोता झाल्याने हा मतदार संघ सेनेच्या वाट्याला गेला. मागील चूक यावेळी होणार नाही. येणाऱ्या निवडणुकीत लातूर ग्रामीण भाजपचाच असेल आणि भाजपाच ताकदीने निवडणूक लढवेल असे भाजपाचे पक्ष निरीक्षक माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले. दरम्यान लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातून आ. रमेशआप्पा कराड यांनाच भाजपाने उमेदवारी द्यावी अशी एकमुखी मागणी मतदार संघातील जवळपास सर्वच पक्ष पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी यावेळी केली.
आ. रमेशआप्पा कराड, विक्रम शिंदे, नवनाथ भोसले, अनिल भिसे, भिसे, दशरथ सरवदे यांच्यासह अनेकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. उपस्थित कार्यकत्यांना लोणीकर यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले काँग्रेस विकास आघाडी पेक्षा राज्यातील महायुती शासनाने शंभरपटीने अधिक काम केले आहे. याची जाणीव कार्यकत्यांनी मतदारांना करून द्यावी लातूर ग्रामीण भाजपाचा बाले किल्ला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत ही जागा भाजपाने लढवली असती तर निश्चितपणे एक भाजपचा आमदार बाढला असता, मागील वेळी झालेली चूक यावेळी होणार नाही. लातूर ग्रामीणची जागा भाजपाकडेच असेल आणि ताकदीने लढवेल असेही लोणीकर म्हणाले. सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले.करून द्यावी लातूर ग्रामीण भाजपाचा बाले किल्ला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत ही जागा भाजपाने लढवली असती तर निश्चितपणे एक भाजपचा आमदार बाढला असता, मागील वेळी झालेली चूक यावेळी होणार नाही. लातूर ग्रामीणची जागा भाजपाकडेच असेल आणि ताकदीने लढवेल असेही लोणीकर म्हणाले. सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातून भाजपा पक्षाची उमेदवारी कोणाला देण्यात यावी यासाठी पक्षाचे निरीक्षक माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी मंगळवारी भाजपाच्या संवाद कार्यालयात पक्ष पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून व्यक्तिगत संवाद साधून प्रत्येकाची भावना जाणून घेतली. यावेळी बहुतांशी पक्षाच्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी आ. रमेशआप्पा कराड यांनाच लातूर ग्रामीण मतदार संघातून उमेदवारी देण्यात यावी अशी एकमुखी मागणी लोणीकर यांच्याकडे केली.