Latur Political News : अनौपचारिक संवादातून उजळले राजकीय आयुष्याचे क्षण

राज्यपाल बागडे यांची आ. पवारांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
Latur Political News
Latur Political News : अनौपचारिक संवादातून उजळले राजकीय आयुष्याचे क्षण File Photo
Published on
Updated on

Governor Bagde pays a goodwill visit to MLA Pawar's residence

लातूर, पुढारी वृत्तसेवा : दीपावलीच्या शुभप्रसंगी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी आमदार अभिमन्यू पवार यांच्या औसा येथील जन्मेजय निवासस्थानी शनिवारी (दि २५) सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी पवार कुटुंबीय, ज्येष्ठ स्वयंसेवक व विचार परिव-ारातील सहकारी कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केलेया वेळी महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) चे उपाध्यक्ष आ. राण-ाजगजितसिंहज पाटील उपस्थित होते.

Latur Political News
Latur Crime News : लहान भावाच्या खूनप्रकरणी मोठ्या भावास पाच दिवसांची पोलिस कोठडी

बागडे यांनी आपल्या समृद्ध राजकीय व सामाजिक अनुभवातून मार्गदर्शन केले. चर्चेदरम्यान त्यांनी आपल्या दीर्घ राजकीय प्रवासाचा आढावा घेत विविध अनुभवांची उजळणी केली. मंत्री म्हणून काम करताना अनेक सकारात्मक आणि लोकहिताच्या निर्णयांची अंमलबजावणी घडवून आणल्याचा उल्लेख त्यांनी केला.

एके दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट फोन करून राजस्थान राज्यपालपदाची जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली, तो क्षण माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि अविस्मरणीय होता, असे बागडे भावुकपणे म्हणाले. २०१४ साली पक्ष नेतृत्वाने माझ्यावर विश्वास दाखवत मला महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी नियुक्त केले. यापूर्वी राज्याच्या कॅबिनेट मंत्रिपदाची जवाबदारी सांभाळताना जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अनेक ठोस पावले उचलली असल्याचाही त्यांनी उल्लेख केला.

Latur Political News
Latur News : आ. अभिमन्यू पवारांच्या पाठपुराव्याला यश; लातूरच्या रिंग रोडसह चार मोठे प्रकल्प मार्गी!

या प्रसंगी आ. अभिमन्यू पवार यांनी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे स्वागत करत त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. पवार म्हणाले, राज्यपाल बागडे यांचे नेतृत्व आणि अनुभव हे नव्या पिढीच्या राजकारण्यांसाठी प्रेरणादायी आहेत. कार्यकर्त्यांनीही राज्यपालांशी संवाद साधला. मंगलमय वातावरणातील हा मनमोकळा संवाद कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरला.

यावेळी प्रभुअप्पा राचटे, सुरेश कारंजे, सुशील बाजपेई, कंटप्पा मुळे, ह.भ.प. दत्तात्रय पवार गुरुजी, डॉ. अमोल जगताप, संदीपन जाधव, व्यंकट मोरे, चंद्रशेखर सोनवणे, प्रा. भीमाशंकर राचटे, संतोष मुक्ता, सुभाष जाधव, किरण उटगे, काकासाहेब मोरे, सुनील उटगे, संगमेश्वर ठेसे, अॅड. परीक्षित पवार, बसवराज धाराशिवे, धनराज परसणे, माधवसिंह परिहार, आप्पासाहेब कोपरे, रुपेश कारंजे, उन्मेष वागदरे आदींसह संघपरिवारातील सदस्य उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news