

Ausa taluka brother sister death
औसा : औसा तालुक्यातील वाघोली येथील शिंदे कुटुंबावर काळाने झडप घातली असून अपघातामध्ये पद्माकर शिंदे यांचा मुलगा आणि मुलगी अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत जागीच ठार झाले आहेत. सस्ख्या बहिण-भावाचा मृत्यू झाल्याने वाघोली गावावर शोककळा पसरली आहे. ही घटना आज (दि.७) सकाळी १२च्या दरम्यान घडली.
आज सकाळी बारा च्या सुमारास औसा येथील तुळजापूर टी पॉईंट नजीक देवयानी साडी सेंटरजवळ वाघोली येथील दोघे बहीण भाऊ (एम.एच.२४-बीएम-०६५३) मोटारसायकलीवरून वाघोलीकडून लातूरकडे जात असतानाच भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने रोडवर पडले व मागून येणाऱ्या ट्रॅकने त्यांना चिरडले.
या अपघातात वाघोली ता. औसा येथील बहीण - प्रसाद पद्माकर शिंदे (वय २५) व बहीण गायत्री पद्माकर शिंदे (वय २०) व हे भरधाव येणाऱ्या ट्रकखाली चिरडले गेले. त्यांच्या डोक्यावरूनच ट्रक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, घटनास्थळावर रक्त आणि मासांचा सडा पडला होता.
दोघेही बहिण-भाऊ शिक्षण घेत होते. ते लातूरला परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी जात असतानाच त्याच्यावर काळाने घाला घातला आणि भविष्यातील स्वप्नाचा चुराडा झाला. प्रसाद पद्माकर शिंदे व गायत्री पद्माकर शिंदे हे शिक्षण घेत होते.
औसा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून औसा येथे शवविच्छेदन केल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आले. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दोघांचाही वाघोली येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अपघातानंतर बोलेरो आणि ट्रक दोन्ही वाहनांचे चालक वाहनांसह घटनास्थळावरून पळून गेले आहेत. पोलिसांकडून सध्या दोन्ही वाहनांचा शोध सुरू आहे. पोलिसांचे पथक शोधासाठी रवाना करण्यात आल्याची माहिती औसा पोलीस ठाण्याचे अधिकारी रेवण धमाले यांनी दिली.