चंदनझिरा : शहरातील चंदनझिरा भागातील भाविकांचे ग्रामदैवत आणि श्रद्धास्थान असलेल्या नवसाला पावणारा सिद्धिविनायक गणपतीच्या दर्शनासाठी गर्दी होत आहे. गणेशोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
येथील सिद्धिविनायकाची मूर्ती शेंद्रवर्णीय आणि महत्त्वाचे म्हणजे उजव्या सोंडेची आहे. जुन्या काळात ही मूर्ती साध्या चौथऱ्यावर होती. मात्र, वर्ष २००९ मध्ये गणेशभक्तांनी या मंदिराचा लोकवर्गनीतुन मंदीराचा जीर्णोद्धार केला. याच मंदिरामुळे चंदनझिरा येथील कॉलनीचे सिद्धिविनायक नगर असे नाव पडले. ही मुर्ती पाषाणात घडवलेली, पितांबर वस्त्रधारी असुन उजव्या सोंडेची सिद्धिविनायकाचे विलोभनीय आहे.
गणेशभक्तांनी सिद्धीविनायकाच्या संपूर्ण बांधकाम केले असुन तिथे महादेव पींड व नंदीची प्रतिष्टा केलेली आहे. चंदनझिरा या परिसरातील नागरिक नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेर राहावयास गेलेले असले तरी चंदनझिरा गणेश ऊत्सवानिम्मित मूळगावी परतल्यावर आवर्जून सिद्धिविनायकाचे दर्शन घेतात. दर महिन्याच्या चतुर्थीला भाविक भक्तिभावे सिद्धिविनायकाचे पूजा करतात सिद्धिविनायकाची उजव्या सोंडेची मूर्ती असणे हे दुर्मिळ बाब आहे. त्यामुळे हा गणपती नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. सतीश जोशी पुरोहित अभिषेक करतात.
गणेशोत्सवाच्या काळात सिद्धिविनायकाची सकाळ आणि संध्याकाळ महाआरतीचे आयोजन करण्यात येते तसेच गणेश जयंती मध्ये सप्ताहचे आयोजन असल्याने तेथे भागवत कथा, किर्तनमाला, हरिपाठ, विविध धार्मिक कार्यक्रमाचा श्रवन आवर्जून करुन मनोभावाने सिद्धिविनायकाचे दर्शन सहपरिवारासहीत घेतात.