

आखाडा बाळापूर; पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी तालुक्यातील भुरक्याची वाडी येथील एका तरुणास शेतातून घराकडे येत असताना पाठीमागून अज्ञात ऑटोने जोराची धडक दिली. यात त्याचा मृत्यू झाला. सुदाम यशवंत खोकले असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी अज्ञात ऑटो चालकावर आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृताचा भाऊ गोविंद यशवंत खोकले यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी (दि. १६) सकाळी साडेसहा वाजता सुदाम शेतातून घरी पायी येत होता. यावेळी बहुर पाटी येथे त्यांच्या पाठीमागून बाळापुर कडून बोटीकडे जाणाऱ्या भरधाव ऑटोने (एम एच २२ यु १३४) त्यांना जोराची धडक दिली. यात डोक्याला गंभीर मार लागून त्यांचा मृत्यू झाला.
घटनास्थळी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे जमादार सुनील रिठे शिवाजी पवार व पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा केला. पुढील तपास जमादार सुनील रिठे करीत आहेत