Hingoli News : निधी मागणीचे प्रस्ताव तत्काळ सादर करा

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठकीत निर्देश
Hingoli News
Hingoli News : निधी मागणीचे प्रस्ताव तत्काळ सादर करा File Photo
Published on
Updated on

Submit funding proposals immediately.

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२५-२६ अंतर्गत निधी मागणीचे परिपूर्ण प्रस्ताव तत्काळ सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा बैठकीत दिले.

Hingoli News
Hingoli Political News : पालकमंत्र्यांवर सत्ताधारी आमदारही नाराज

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी गं. गो. चितळे, प्रदीप नळगीरकर, समाज कल्याणच्या सहायक आयुक्त गीता गुड्डे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी सुनील बारसे यांच्यासह सर्व विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२५-२६ अंतर्गत विविध विकास योजनांचे निधी मागणीचे परिपूर्ण प्रस्ताव तत्काळ सादर करावेत.

क्रीडांगण विकास कामासाठी आदर्श शाळाचा समावेश करावा. जिल्ह्यात आदर्श शाळा निर्माण करण्यासाठी लागणाऱ्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच संगणक प्रयोगशाळा निर्माण करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. यासाठी अतिरिक्त लागणारा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी गुप्ता यांनी दिले.

Hingoli News
Hingoli News : शेतकऱ्यांच्या शेकडो क्विंटल धान्याची नासाडी

यावेळी मृद व जलसंधारण, दुग्धशाळा विकास, महावितरण, पोलिस, जिल्हा परिषद, पशुसंवर्धन विभाग, मत्स्यव्यवसाय, क्रीडा विभाग, कौशल्य विकास योजना, पाणीपुरवठा व स्वच्छता, कृषी विभाग, जिल्हा आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण, महिला व बालविकास विभाग, वन विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरविकास, पाटबंधारे, शिक्षण, परिवहन विभाग यासह विविध विभागांच्या प्रस्तावाबाबत चर्चा करण्यात आली.

बैठकीत प्रशासनाच्या विविध विभागांना त्यांच्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. तसेच जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनाचाही यावेळी आढावा घेण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news