काँग्रेसची आंदोलनातही गटबाजी! सातव-पाटील गटाचे वेगळे आंदोलन

काँग्रेसची आंदोलनातही गटबाजी!सातव-पाटील गटाचे वेगळे आंदोलन
Hingoli Politics News
काँग्रेसची आंदोलनातही गटबाजी!सातव-पाटील गटाचे वेगळे आंदोलनpudharui photo
Published on
Updated on

हिंगोली: जिल्हा काँग्रेसमधील गटबाजी थांबत नसल्याचे गुरुवारी पुन्हा एकदा समोर आले आहे. खासदार राहुल गांधी यांना धमक्या देणाऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले तर दुसरीकडे माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांनी देखील आंदोलन केले. कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दोन वेगवेगळी आंदोलने केल्याने कॉंग्रेसमधील गटबाजी उघड झाली. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये सुरू असलेली गटबाजी वरिष्ठांची डोकेदुखी वाढविणारी ठरते आहे.

गेल्या काही दिवसांपासून महायुती मधील वाचाळवीर नेते लोकसभेतील विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांची हत्या करण्याच्या, त्यांना शारीरिक इजा पोहोचवण्याच्या धमक्या देत आहेत. हे अत्यंत गंभीर असून या वाचाळबीर नेत्यांविरोधात कठोर कारवाई करा या मागणीसाठी हिंगोलीत विधान परिषदेचे आमदार प्रज्ञाताई सातव यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

या धमकीवीरांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी जर या धमकीबाजांवर तत्काळ कारवाई न झाल्यास काँग्रेस पक्षाकडून राज्य सरकार विरोधात अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव यांनी दिला आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई, महिला जिल्हाध्यक्ष वनिता गुंजकर, तालुकाध्यक्ष भागवत चव्हाण, माजी शहराध्यक्ष बापुराव बांगर, सेवादल जिल्हाध्यक्ष सुदाम खंदारे, माजी नगराध्यक्ष सुधीर सराफ, कृउबा संचालक शामराव जगताप, जिल्हा उपाध्यक्ष विलास गोरे, माजी नगरसेवक अनिल नेनवानी, सरपंच गजानन थोरात, विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जुबेर मामु, माजी जि.प सदस्य गजानन देशमुख, आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष गजानन ढाकरे, महेश थोरात, कृउबा संचालक रवी डोरले, जयश्री सातव, बासीत मौलाना आदींची उपस्थिती होती.

मागील काही दिवसांपासून भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांकडून सातत्याने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना हत्या करण्याच्या आणि जीविताला धोका निर्माण करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. राहुल गांधी यांना धमक्या देणाऱ्या नेत्यांवर गुन्हे नोंद करून त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी पोलिस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी भाऊ पाटील गोरेगावकर, भास्कर बेंगाळ, शेख नईम शेख लाल, आबेद अली खान, के. जे. अरगडे, शेख नौमान नवेद, सतीश लोणकर, साद अहमद, पवन उपाध्याय, दाजीबा पाटील, एकनाथ शिंदे, आकाश जगताप, बापूराव पाटील, शेख बासिद, पठाण साजिद खान, उल्हास पाटील, लखन पठाडे, आकाश जाधव, कलिम खान, अमोल पाटील, शेख इस्माइल, शालिक ताले, संतोष जाधव, संजय देखमुख आदींची उपस्थिती होती.

Hingoli Politics News
Dhule Lok Sabha | दोन दिवसात उमेदवार बदला, धुळ्यात काँग्रेस मधील गटबाजी उफाळली; नाराज गटाचे राजीनामा अस्र

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news