आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यात कयाधू नदीच्या पुराच्या पाण्यात देवजना येथील रामराव भुजंगराव कल्याणकर यांच्या शेतामधील आखाड्यावर रविवारी रात्री एक वाजल्यापासून २० जण अडकले आहेत. यामध्ये महिला आणि पुरुषांचाही समावेश आहे.
याबाबत माहिती मिळताच पोलीस प्रशासन, महसूल विभागाचे अधिकारी यांच्यासह आमदार संतोष बांगर आणि आपत्ती व्यवस्थापनची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. मदत कार्य सुरू असल्याचे आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांनी सांगितले.