

जवळाबाजार : येथील श्री बसवलींग मठावर शनिवारी रात्री मठात किर्तन सोहळा सुरू असताना अचानक अज्ञात समाजकंटकांकडून दगडफेक करण्यात आली याचा रविवार पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन हिंदु समाज बांधव कडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
दि.४ ऑक्टोबर रोजी येथील श्री बसवलींग मठा मध्ये शनिवारी रात्री श्री गुरू बसवलींग स्वामी यांचा पुण्यतिथीनिमित्त शनिवार पासून दररोज किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी रात्री किर्तन सुरू असताना अचानक अज्ञात समाजकंटकांकडून मठावर दगडफेक करण्यात आली. या वेळी मठात भाविक भक्त मोठ्याप्रमाणात उपस्थितीत होते या गंभीर बाबीचा निषेध करण्यात आलाअसून याअगोदर सुध्दा मठावर दगडफेक करण्यात आली होती असे लेखी निवेदना मध्ये उल्लेख केलेला आहे. तरी सदरील अज्ञात समाज कंठावर शोध घेऊन कार्यवाही करण्यात यावी या साठी येथील हिंदु समाज बांधवाकडून ५ 'ऑक्टोबर रविवार सकाळी ११ वाजता येथील पोलीस चौकीत निवेदन देण्यात आले आहे. असून या गंभीर बाबीची दखल घेऊन कार्यवाही करण्यात यावी असे निवेदनावर मोठ्याप्रमाणात हिंदु समाज बांधव उपस्थितीत होऊन स्वाक्षरी केला आहेत.