औंढा नागनाथ : तालुक्यातील ग्रामीण भागासाठी असलेल्या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ऑगस्ट २०२४ मध्ये एकूण ३ हजार ७७७ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले असून त्यापैकी ९४१ घरकुलांना मंजुरी देण्यात आली. परंतु त्यापैकी पूर्वी इतर योजनेतून घरकुल घेतलेल्या ४६१ लाभार्थ्यांचे घरकुल पंचायत समितीमार्फत रद्द करण्यात आले आहेत. तर कुटुंबातील इतर व्यक्तीला लाभ देण्यात आलेला असल्याने अनेकांची नावे आप आपच मंजूर झालेल्या यादीमधून कमी होत आहेत. अशी माहिती औंढा नागनाथ येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गोपाळ कलारे यांनी दिली.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या औंढा नागनाथ तालुक्यातील प्रपत्र ड मधील ३ हजार 203 घरकुल लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभ देण्यात आला आहे. तालुक्यातील मागास प्रवर्गातून २ हजार २०० तर इतर प्रवर्गातून १ हजार ४२६ लाभार्थ्यांची निवड करण्यात आल्यामुळे त्यांना आता हक्काचे घर मिळणार आहे. २०१६ मध्ये घरकुलासाठी पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रपत्र ड मध्ये त्यांचा समावेश करून मंजुरीस्तव यादी पाठवण्यात आली होती. त्यानुसार प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तालुक्यात ३ हजार ७७७ लाभधारकांनी निवड करण्यात आली आहे.त्यापैकी आतापर्यंत १ हजार ८३५ घरकुल धारकाना पंचायत समिती कार्यालयातर्फे मंजुरी देण्यात आली तर ९३५ लाभार्थ्यांना पहिला हप्ता वाटप करण्यात आला असल्याची असल्याची माहिती गट विकास अधिकारी गोपाल कल्हारे यांनी दिली.
मंजूर झालेल्या घरकुलांपैकी यापूर्वी विविध योजन तून लाभ घेतलेल्या ४६१लाभार्थ्यांचे घरकुल रद्द करण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. पहिला हप्ता न भेटलेल्या घरकुल उर्वरित पात्र लाभाथ्यानी आवश्यक ती कागदपत्रे पंचायत समिती कार्यालयात किंवा ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे त्वरित जमा करून घरकुलाचा पहिला हप्ता खात्यात वर्ग करून घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यापूर्वी ज्या कुटुंबामध्ये घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे आणि आता कुटुंब फोडून मंजूर झालेले घरकुल जर मिळाले असेल तर बहुतांश घरकुले रद्द होऊन इतरत्र वळविल्या जाणार आहेत किंबहुना पात्र लाभ धारकांच्या यादीमध्ये इतर गावांमध्ये जर शिल्लक लाभधारक असतील तर अशा लाभधारकांना घरकुलांचा लाभ मिळणार त्यामुळे एक वेळेस लाभ घेतलेल्या कुटुंबास पुन्हा घरकुलाचा लाभ घेता येणार नसल्याचेही गटविकास अधिकारी कलारे यांनी सांगितले.