ओंढा; पुढारी वृत्तसेवा : औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडी परिसरात तब्बल 30 किलो वजनाचा इंडियन रॉक पायतन दुर्मिळ अजगर आज (दि. ३) सर्पमित्रांनी रेस्क्यू केला. या अजगराची माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांनी पाहण्यासाठी गर्दी करण्यास सुरुवात केली होती.
सर्पमित्रांनी रेस्क्यू केलेला अजगर औंढा वन विभागाकडे सुपूर्द करण्यात आला. यानंतर हा अजगर औंढा वनविभागाच्या वन पर्यटन परिसरात आज (दि. 3) दुपारी दीड वाजता सोडण्यात आला. या दुर्मिळ प्रजातीच्या अजगराबद्दल तलाठी संजय पाटील यांनी माहिती दिली यावेळी पोलीस निरीक्षक जीएस राहिरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अफसर पठाण, सर्पमित्र महादेव कपाटे, वनरक्षक अंगद आयनिले, गजानन श्रीरामे यांच्यासह वन विभागाचे अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.