औंढा नागनाथ, पुढारी वृत्तसेवा : औंढा नागनाथ ते हिंगोली जाणाऱ्या रस्त्यावर पिंपळदरी फाट्याजवळ औंढा नागनाथकडून हिंगोलीकडे जाणाऱ्या छोटा हत्ती वाहन क्रमांक एम एच २६ बी इ २६७५ व हिंगोलीकडून औंढा नागनाथकडे येणाऱ्या आयशर टेम्पो क्रमांक एम एच ४४ यू ३६२४ च्या समोरासमोर झालेल्या धडकेत तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी पावणे बाराच्या सुमारास घडली.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक जी.एस. राहिरे, सहायक पोलिस उपनिरीक्षक अफसर पठाण, जमादार मोहम्मद शेख यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
सागर राधेश्याम लोका वय ४५ वर्षे रा. नांदेड, आकाश विनोद पांडे वय २६ वर्ष रा. मुंबई, संकटा प्रकाश पटेल वय ४० वर्ष रा. नांदेड असे जखमी झालेल्यांची नावे असून त्यांच्यावर औंढा ग्रामीण रुग्णालयात डॉ. सतीश वाकडे, स्वाती इंगळे, सोनाली देवरे यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे रेफर केले.