लिंगदरी येथे पिकनिक पॉइंट उभारणीसाठी प्रयत्न करा; जिल्हाधिकारी गोयलांच्या सूचना

लिंगदरी येथे पिकनिक पॉइंट उभारणीसाठी प्रयत्न करा; जिल्हाधिकारी गोयलांच्या सूचना
लिंगदरी येथे पिकनिक पॉइंट उभारणीसाठी प्रयत्न करा; जिल्हाधिकारी गोयलांच्या सूचना
लिंगदरी येथे पिकनिक पॉइंट उभारणीसाठी प्रयत्न करा; जिल्हाधिकारी गोयलांच्या सूचनाpudhari news
Published on
Updated on

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील लिंगदरी येथे सामाजिक वनीकरण विभागाने शेडनेट, पॉलीहाऊसमध्ये उभारणी केलेल्या रोपवाटिकेचे कौतुक करीत या भागात पिकनिक पॉइंट उभारणीसाठी वनीकरण विभागाने प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिल्या आहेत.

सेनगाव तालुक्यातील वनीकरण विभागाच्या विविध रोपवाटिकांची त्यांनी पाहणी केली. यावेळी विभागीय वनीकरण अधिकारी पुष्पा पवार, वन परिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ टाक, वनपाल स्वाती कीर्तनकार, बिरसोने, वनरक्षक शिंदे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी गोयल यांनी रोपवाटिकांची पाहणी केली. तसेच पॉलीहाऊस व शेडनेटमध्ये उभारण्यात आलेल्या रोपवाटिकांची पाहणी करून त्यातील विविध प्रजातीच्या रोपांची माहिती घेतली. या रोपांचा शेतकरी, नागरिकांना कशा प्रकारे उपयोग होईल याची माहितीही पुष्पा पवार यांनी दिली. या रोपवाटिकांची पाहणी करून त्यांनी अधिकाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

लिंगदरी येथे उभारण्यात आलेली सेंट्रल नर्सरी उत्कष्टरीत्या तयार केली असून त्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. या रोपवाटिकांच्या माध्यमातून सहा लाख रोपे उपलब्ध होणार आहेत. त्याचा पुढील वर्षी वृक्षारोपणासाठी फायदा होणार असून पुढील वर्षी जिल्ह्यात सर्व यंत्रणांच्या माध्यमातून किमान २० लाख रोपे लावली जातील. त्यासाठी वनीकरण विभागाच्या रोपवाटिकेतील रोपे घेतली जातील. या शिवाय नागरिक, शेतकरी यांनाही रोपे दिली जाणार असून हमी योजनेंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा रोपे लावण्याचा प्रयत्न असणार आहे.

या ठिकाणी वनीकरण विभागाने पिकनिक पाइंट उभारण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच बालोद्यान उभारणी करावी अशा सूचना त्यांनी वनीकरण विभागाला दिल्या आहेत. यावेळी वन अधिकारी पुष्पा पवार, वन परिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ टाक यांनी जिल्ह्यातील वनीकरण विभागाच्या कामाची माहिती दिली.

शिवाजी पुलाचे पिकनिक पॉइंट करणे प्रशासनाला झेपेल का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news