हिंगोली : कळमनुरी पालिकेचा लाचखोर मुख्याधिकारी निलंबित

file photo
file photo
Published on
Updated on

कळमनुरी, पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी येथे सिमेंट रस्त्याच्या कामाचे देयक काढण्यासाठी ४० हजाराची लाच घेतल्या प्रकरणी पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी उमेश कोठीकर यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या निलंबनाचे आदेश नगरविकास विभागाने काढले असून, असे आदेश शुक्रवारी (दि.२) पालिकेला प्राप्त झाले आहेत.

कळमनुरी येथे पालिकेच्या वतीने एका कंत्राटदारामार्फत रस्त्याचे बांधकाम केले होते. तसेच कामाचे आठ लाख रुपयांचे देयक अदा करणे बाकी होती. त्यामुळे कंत्राटदाराने पालिका मुख्याधिकारी उमेश कोठीकर यांच्याकडे वारंवार देयकाची मागणी केली. मात्र कोठीकर याने त्यासाठी ४० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार केली होती. त्यावरून लाचलुचपतचे उपाधीक्षक निलेश सुरडकर, पोलीस निरीक्षक प्रफुल्ल अंकूशकर, विजय पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख युनुस, जमादार विजय उपरे, तानाजी मुंडे, राजाराम फुफाटे, ज्ञानेश्‍वर पंचलिंगे यांच्या पथकाने १५ जुलै रोजी सापळा रचून कोठीकर यास चाळीस हजाराची लाच घेताना पकडले होते.

या प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. लाचलुचपत विभागाने या प्रकाराची सविस्तर माहिती नगरपालिका प्रशासन व शासनाकडे सादर केली होती. त्यावरून राज्याच्या नगर विकास विभागाने तत्कालीन मुख्याधिकारी उमेश कोठीकर यास निलंबीत केले आहे. त्याच्या निलंबनाचे आदेश आज पालिकेला प्राप्त झाले आहेत.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news