तलमोडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ११ जणांना अटक

Dharashiva News | दोन्ही कारवाईत सव्वाचार लाखांचा मुद्देमाल जप्त
crime news
तलमोडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ११ जणांना अटक file photo
Published on
Updated on
शंकर बिराजदार

उमरगा : उमरगा तालुक्यातील सीमावर्ती भागात तलमोड येथील जुगार अड्ड्यावर तसेच डिग्गी येथील शिंदी विक्री अड्ड्यावर रविवारी (दि. ८) पोलिसांनी दोन वेगवेगळे छापे टाकले. दोन्ही छाप्यातील रोख रकमेसह सव्वा चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी ११ जणांना अटक केली आहे. पोलिसांनी साध्या पोषाखात केलेल्या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साध्या पोषाखात गस्तीवर असलेल्या फिरत्या पोलीस पथकाला तलमोड येथे अर्जुन मुरलीधर साळुंके हा स्वतःच्या घरी आंतराज्य तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास साध्या पोषाखातील पोलीस पथकाने घरात सुरु असलेल्या तिर्रट नावाच्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. तेथून पोलिसांनी ५१ हजार १०० रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, ८ मोबाईल, तीन दुचाकींसह २ लाख ६४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी अर्जून साळूंखे, शंकर एकनाथ सुर्यवंशी (रा हंद्राळ), अंगद चंद्राम मंडले (रा. तलमोड), शिवराज भास्कर सुर्यवंशी (रा. कोळसुर-गुं), लक्ष्मण लिंगाप्पा सास्तूरे, मोहन नारायण व्हनाळे, चंद्रकांत गुलाब सास्तुरे, संजीव राम शिरसे (चौघेही रा. धाकटीवाडी ता. उमरगा) व रणजीत वाडीकर (रा. उरळी ता. बसवकल्याण जि. बिदर) यांना ताब्यात घेतले आहे.

डिग्गी शिवारात शिंदी विक्री अड्ड्यावर छापा

तत्पूर्वी पोलीसांनी डिग्गी शिवारात बेकायदेशीर सुरू असलेल्या शिंदी विक्री अड्ड्यावर छापा टाकला. या छाप्यात १ लाख ५२ हजार रुपये किंमतीची १ हजार ९०० लिटर शिंदी जागीच नष्ट करीत अड्डा उध्वस्त केला. याप्रकरणी उसनय्या मारुती तेलंग, विठ्ठल संगमेश्वर वाघमारे (दोघेही रा. डिग्गी) यांना अटक करण्यात आली. या दोन्ही कारवाईतील ११ जणांविरोधात पोलिस नाईक नवनाथ भोरे यांनी दिलेल्या दोन वेगवेगळ्या फिर्यादीवरून उमरगा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक यासीन सय्यद करीत आहेत. पोलीस उपअधीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले, सपोनि श्रीकांत भराटे, पि. के. कन्हेरे, पोउपनि गजानन पुजरवाड, पोलीस नाईक नवनाथ भोरे, यासीन सय्यद यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

crime news
कन्नड-चाळीसगाव रोडवर बस-दुचाकीचा भीषण अपघात, २ पोलीस पुत्रांचा मृत्‍यू

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news