

Bhoom municipal council election
भूम: भूम नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत बुधवारी (दि. ८ ) तहसील कार्यालयातील सभागृहात पार पडली. यावेळी उपविभागीय अधिकारी रैवैयाह डोंगरे, मुख्याधिकारी शैला डाके यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी आणि राजकीय नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण सोडत विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून पारदर्शक पद्धतीने करण्यात आली. यावेळी नगरपरिषदेचे चित्र ५० टक्के महिला व ५० टक्के पुरुष असे तरी सध्या दिसत आहे. आरक्षणात अनुसूचित जाती महिला – ३, अनुसूचित जमाती – १, नागरिकांचा मागास प्रवर्ग – ५, सर्वसाधारण – ६, सर्वसाधारण महिला – ५ असे आरक्षण निश्चित झाले.
महत्वाचे म्हणजे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेला राखीव सुटल्याने आगामी निवडणुकीत महिलांमध्ये चुरस वाढणार आहे. काही विद्यमान नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित पडल्याने निराशा दिसून आली, तर काहींच्या अपेक्षेप्रमाणे आरक्षण आल्याने आनंद व्यक्त करण्यात आला.
1. प्र. क्र. १: अनुसूचित जाती महिला / सर्वसाधारण
(एस. पी. कॉलेज, एस.टी. डेपो, रामहरी नगर)
2. प्र. क्र. २: सर्वसाधारण महिला / अनुसूचित जमाती
(लक्ष्मी नगर, गालिब नगर, जिल्हा परिषद शाळा, आलमप्रभू रोड)
3. प्र. क्र. ३: सर्वसाधारण महिला / सर्वसाधारण
(पं. स. कार्यालय, गुरुदेव दत्त हायस्कूल, समर्थ नगर, पं. ज. नेहरू उद्यान)
4. प्र. क्र. ४: मागास प्रवर्ग महिला / सर्वसाधारण
(न. प. कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, गोष्टी गल्ली, झगडे गल्ली, शेळके गल्ली, कदम गल्ली)
5. प्र. क्र. ५: अनुसूचित जाती महिला / सर्वसाधारण
(आठवडी बाजार, कल्याण नगर, वडर गल्ली, साठे नगर, कल्याण स्वामी मठ, शेंडगे गल्ली, लेंडी नदी)
6. प्र. क्र. ६: सर्वसाधारण महिला / मागास प्रवर्ग
(बानगंगा नदी, कसबा, देशमुख झील, शेटे गल्ली, नाईकवाडी)
7. प्र. क्र. ७: मागास प्रवर्ग महिला / सर्वसाधारण
(गांधी चौक, गराडा, वीर सावरकर चौक, नीलगर खुट, शालू गल्ली, पौळ घर)
8. प्र. क्र. ८: मागास प्रवर्ग महिला / सर्वसाधारण
(मेहंतीशावली दर्गा, आकरे वीर, कुरेशी गल्ली, माळी गल्ली, मोगल वाडा, इंदिरा नगर, शिवशंकर नगर)
9. प्र. क्र. ९: सर्वसाधारण महिला / मागास प्रवर्ग
(कोष्टी गल्ली, शिवाजीनगर, शाळू गल्ली, लोंढे, आलमप्रभू नाला, एकटांगी कब्रस्तान)
10. प्र. क्र. १०: जमाती महिला / सर्वसाधारण
(माळी मिल, न्यू समर्थ नगर, समर्थ नगर, इंदिरा नगर, शिवाजीनगर) याप्रमाणे भूम नगर परिषदेचे आरक्षण सोडत जाहीर झाले आहे.
यावेळी नगरपरिषद अधिकारी गणेश जगदाळे, शशी माळी, तुकाराम माळी, तानाजी नाईकवाडी, प्रकाश गाढवे, आर. डी. तट, आर. एस. मोहिते आदी उपस्थित होते. भूम नगरपरिषदेची निवडणूक आता रंगतदार होणार असून, पुढील काही दिवसांत राजकीय हालचालींना वेग येण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.