छत्रपती संभाजीनगर : पुणे जिल्ह्यातील माळशेज घाट फिरण्यासाठी गेलेल्या वैजापूर तालुक्यातील जिगरबाज तरुणाने प्रसंग सावधान दाखवून तीन पर्यटकांचे प्राण वाचवले. यासेर चाऊस असे या तरूणाचे नाव आहे.
माळशेज घाट येथील कालू धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांना नदी ओलांडून पायी जावे लागते. मात्र अचानक नदीत पाण्याचा प्रवाह वाढल्याने नदीत अडकलेल्या तीन पर्यटकांना या तरुणाने वाचवले. नदीच्या अडकलेल्या अनेक जणांना दोरीच्या सहाय्याने त्याने सुरक्षित बाहेर काढले. त्यामुळे संभाजीनगरच्या यासेर चाऊस या तरुणाच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याचा पर्यटकांना वाचवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.