छ.संभाजीनगर : अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत दोघे ठार

पाचोड येथील पेट्रोल पंपासमोरील घटना
Chhatrapati Sambhajinagar accident
चारचाकी वाहनाच्या धडकेत दोघे ठार
Published on
Updated on

पैठण : अज्ञात चारचाकी वाहनाने मोटरसायकलला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (दि.२९) सायंकाळी पाचोड- पैठण मार्गावरील पेट्रोल पंपासमोर झाला. छगन एकनाथ भांगळ (वय ५८ रा. थेरगाव ता.पैठण) व गोरख भाऊराव हिगले (वय ६०, रा. लिंबगाव ता.पैठण) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.

Chhatrapati Sambhajinagar accident
Raigad Crime | जेवण बनवलं नाही म्हणून पत्नीचे भिंतीवर डोके आपटून केलं ठार

अधिक माहिती अशी, पाचोड येथे गोरख भाऊराव हिंगले यांच्या मोटरसायकलमधील पेट्रोल संपले. त्यामुळे ते छगन भांगळ यांच्या मोटरसायकलीवरून पैठण रस्त्यावर असलेल्या पेट्रोल पंपावर पेट्रोल आणण्यासाठी जात होते. यादरम्यान अज्ञात वाहनाने पाठीमागून मोटर सायकलला जोराची धडक दिली. परिसरातील नागरिकांनी दोघांना पाचोड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच सपोनि शरदचंद्र रोडगे, पोलीस उपनिरीक्षक रहाटकर यांनी पथकासह घटनास्थळी पाहणी केली. अज्ञात वाहनाचा पोलिसांकडून शोध सुरू असून अपघाताची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर रहाटकर हे करत आहेत.

Chhatrapati Sambhajinagar accident
Nashik Accident | नांदगावला भीषण अपघातात 2 ठार, 4 गंभीर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news