मराठा समाज असेल किंवा अन्य कोणताही समाज सरकार त्यांची फसवणूक करणार नाही. कायद्याच्या चौकटीत बसेल असे आरक्षण आम्ही मराठा समाजाला देणार आहोत. त्यामुळे मनोज जरांगे यांनी सहकार्य करावे, अशी विनंती मुख्यमंत्री शिंदे यांनी उपोषणकर्ते मनोज जरांगे यांना केली आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने शहरात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मराठा समाजाचा वापर करून घेणाऱ्यांना जाब विचारणार की नाही? असा प्रश्न उपस्थित करताना ते म्हणाले, ज्यांना आतापर्यंत संधी होती त्यांनी काहीही दिले नाही. त्यांनी समाजाच्या भावनांशी खेळ केला आहे. त्यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट करावी असे म्हणत विरोधकांवर निशाणा साधला.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे उपोषणकर्ते उंबरे यांच्या भेटीला रुग्णालयात जातील अशी देखील चर्चा होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी सिद्धार्थ उद्यानात ध्वजारोहण करून, घाटी रुग्णालयाची पाहणी करून डॉक्टरांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी गणेश महासंघाच्या कार्यालयास सदिच्छा भेट देत मुंबईकडे प्रयाण केले.