

The city, which is becoming known as a smart city, is plagued by pollution.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: स्मार्ट शहरात जागो जागी कचऱ्याचे ढीग साचले असून दिवाळीनंतर शहरभर स्वच्छतेची बोंबाबोंब झाली आहे. यावरून महापालिकेची संपूर्ण व्यवस्था कोलमडल्याचं चित्र दिसून येत आहे. दसऱ्यानंतर दररोज सुमारे ५० टनांनी वाढलेला कचरा आता तब्बल साडेचारशे टनांवर गेला आहे. पण घंटागाड्या वेळेवर येत नसल्याने नागरिक अक्षरशः कचऱ्याखाली गुदमरत असून शहरवासीयांना दुर्गंधी, डास आणि कचऱ्याचा सामना करावा लागत आहे.
स्मार्ट शहर म्हणून ओळख बनत असलेले शहर अस्वच्छतेच्या विळख्यात सापडले आहे. महापालिकेने रेड्डी कंपनीकडे कचरा संकलनाचे कंत्राट दिले आहे, पण या कंपनीच्या कामगिरीवर नागरिकांत नाराजी असून नियमानुसार गाड्या रोज ठराविक वेळेत घराघरातून कचरा घ्यायला येत नसल्याचे शहरभर चित्र आहे. अनेक वाँडाँत गाड्या दोन-दोन दिवस येत नाहीत; कुठे उशिराने येतात, तर कुठे अजिबात दिसत नाहीत. त्यामुळे नागरिकांना घरातील कचरा रस्त्याच्या कडेला टाकावा लागत असून शहरच कचरा डेपो बनले आहे.
सिडको, मुकुंदवाडी, गारखेडा, गजानननगर, पुंडलिकनगर, बेगमपुरा, जालना रोडसह अनेक भागांत रस्त्यावर, चौकांत, मैदानात आणि नाल्याशेजारी कचऱ्याचे प्रचंड ढिगारे तयार झाले आहेत. काही ठिकाणी या कचऱ्याला आग लावली जात आहे. त्यामुळे धूर आणि प्रदूषणाचा त्रास वाढला आहे.
त्यातच सध्या पाऊस सुरू असल्याने हा कुजका कचरा दुर्गंधी पसरवत असून डासांच्या प्रादुर्भावामुळे डेंग्यू-मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याची आरोग्य विभागाची कबुली आहे. दरम्यान महापालिकेने सुरू केलेलं ङ्गङ्घमाझा स्वच्छता साथीफ्फअॅप नागरिकांसाठी विनोदच ठरत आहे.
गाड्यांच्या ट्रॅकिंगचा दावा कागदावरच असून नागरिकांना गाडी त्यांच्या भागात केव्हा येणार याची काहीच माहिती नसते. अनेकदा गाड्या ऑफिसवेळेनंतर येतात, त्यामुळे घरातील कचरा तीन-तीन दिवस साचत असल्याने हाच कचरा रस्त्यावर टाकला जात आहे.
केवळ जाहिरातींतच स्वच्छ शहर
मनपाने फक्त जाहिरातीमध्येच स्वच्छ शहर दाखवलंय; वास्तवात मात्र शहर दुर्गंधीने झाकोळलंय. फफदिवाळीच्या काळात शहरातील रस्ते, चौक, गल्लीबोळ कचऱ्याने व्यापलेले दिसत असताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कृतीचा नाही. तर फक्त स्पष्टीकरणांचा पाऊस पडला जात असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.