हतनूर : कन्नड तालुक्यातील हतनूर येथील जैतापूर रस्त्यावरील कन्या आश्रमात एका विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. याच्या निषेधार्थ सोमवारी (दि.२६) हतनूर गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी लवकरात लवकर आरोपीला फाशी देण्यात यावी, अशी मागणी यावेळी गावकऱ्यांनी केली.
यामध्ये हतनूर येथील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी दैनंदिन व्यवहार बंद ठेवत आज बंद पाळला. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्राथमिक, माध्यमिक शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. सायंकाळी ग्रामस्थांच्या वतीने मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आले.