मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पैठणमध्ये रास्‍ता रोको

पैठण तालुका बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
Stop the road in Paithan to support the hunger strike of Jarangs
मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पैठणमध्ये रास्‍ता रोकोFile Photo
Published on
Updated on

पैठण : पुढारी वृत्तसेवा

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने पैठण तालुका बंदची हाक देण्यात आली होती. आज (सोमवार) सकाळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून बाईक रॅली काढून पाचोड फाटा येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित सकल मराठा समाजाच्यावतीने राज्य शासनाचा निषेध करून मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या लढ्याला सर्व स्तरातून सहभागी होऊन पाठिंबा व्यक्त करावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

दरम्यान या रास्तारोको आंदोलनामुळे छत्रपती संभाजीनगर, पाचोड, शेवगाव, गेवराई येथील वाहनांच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक दशरथ बुरुकुल, एकनाथ नागरगोजे, संजय मदने, गोपनीय शाखेचे मनोज वैद्य, नरेंद्र अंधारे, राजेश आटोळे, यांनी विशेष बंदोबस्त ठेवला होता. या बंदला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थी व शासकीय कार्यालयामध्ये दररोज ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाहने व बससेवा काही प्रमाणावर बंद असल्याने अडचण निर्माण झाली. रास्ता रोको आंदोलनाला मराठा समाजातील तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

दरम्यान धनगर समाजाच्यावतीने लक्ष्मण हाके यांना पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील पिंपळवाडी येथील परिसरात धनगर समाजाच्यावतीने आंदोलन केले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि ईश्वर जगदाळे, मंडळ अधिकारी सोनवणे यांना देण्यात आले. यावेळी धनगर समाजातील विविध मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news