छत्रपती संभाजीनगर : वेळी रस्ता सामसूम होता. स्कुटीवर जाणाऱ्या तरुणीला तीन नशेखोरांनी धडक दिली. ती खाली पडल्यानंतर तिच्यावरच शस्त्र उगारत जीव मारण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात त्याच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ बोंबले पिता-पुत्रांनी त्या सशस्त्र नशेखोरांचा सामना करत त्या तरुणीचा जीव वाचवला. आणि नशेखोरांना पुंडलिकनगर पोलिसांच्या स्वाधीन केले.
ही घटना १२ सप्टेंबर रोजी दुपारी सिडको एन-३ भागात घडली. दीपक बालाजी वाघमारे, सौरभ संतोष भालेराव व स्वप्निल सतीश कांबळे अशी आरोपींची नावे आहेत. आर ोपींच्या हल्ल्यात सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ बोंबले हे जखमी झाले आहेत.
१२ सप्टेंबर रोजी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास पूजा (नाव बदलले आहे) स्कुटी वरून सिडको एन ३ परिसरातून जात होती. राँगसाईड भरधाव वेगात स्कुटी (क्र. एमएच २० एफआर ०७६४) वरून आलेल्या तिघां नशेखोरांनी तिला जोराची धडक दिली.