भारतीय तायक्वांदो संघात प्रिशा शेट्टीची निवड, संतोष बस्नेत यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती

भारतीय तायक्वांदो संघात प्रिशा शेट्टीची निवड, संतोष बस्नेत यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जागतिक तायक्वांदो ज्युनियर चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय तायक्वांदो संघाच्या प्रशिक्षकपदी छत्रपती संभाजीनगरच्या संतोष बस्नेत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

‘इंडिया तायक्वांदो’चे अध्यक्ष नामदेव शिरगावकर यांनी भारतीय ज्युनियर तायक्वांदो संघ जाहीर केला आहे. या संघाच्या प्रशिक्षकपदी संतोष बस्नेत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जागतिक तायक्वांदो ज्युनियर चॅम्पियनशिप स्पर्धा दक्षिण कोरियात २८ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे, अशी माहिती इंडिया तायक्वांदोचे सचिव अमित धमाळ यांनी दिली. 

भारतीय तायक्वांदो मुलींच्या संघात प्रिशा शेट्टी, अरण्या ठाकूर, पिहू कुमारी, पूजा, झेना राजा, सक्षम यादव, रामडिंगलानी, वैष्णवी चौधरी, जनानी, टुलीप ओझा या खेळाडूंचा समावेश आहे. सातारा येथील प्रिशा शेट्टी हिला प्रशिक्षक अक्षय खेतमर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. प्रिशा जागतिक तायक्वांदो स्पर्धेत आपला ठसा उमटवेल असा विश्वास महासचिव गफार पठाण यांनी व्यक्त केला आहे. 

भारतीय मुलांच्या संघात मनजीत सिंग राठोड, हरमन सिंग गिल, हार्दिक अहलावत, अमन, कुणाल, नेहाल देवाली, क्षितिज तिवारी, अरमान इन्सान, आयुष शुक्ला आणि उज्ज्वल या खेळाडूंचा समावेश आहे. या संघाच्या प्रशिक्षकपदी संतोष बस्नेत यांची नियुक्ती इंडिया तयाक्वांदोतर्फे करण्यात आली आहे. तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष संदीप ओंबासे, महासचिव गफार पठाण, खजिनदार डॉ. प्रसाद कुलकर्णी यांनी संघातील खेळाडूंचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. 

औरंगाबाद जिल्हा तायक्वांदो संघटनेच्या अध्यक्षा प्रतिभा सानप म्हणाल्या की, ‘प्रशिक्षक म्हणून संतोषचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. तायक्वांदोबद्दलची त्याची आवड आणि तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची त्याची हातोटी विलक्षण आहे. जागतिक व्यासपीठावर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी काम करण्याची संधी मिळाली याचा आम्हाला अभिमान वाटतो.’

जिल्हा असोसिएशनचे सचिव डॉ. प्रसाद कुलकर्णी म्हणाले की, ‘संतोषची नियुक्ती ही त्याच्या प्रतिभेची आणि समर्पणाची योग्य ओळख आहे. त्याच्या कौशल्याचा केवळ संघालाच फायदा होणार नाही तर स्थानिक खेळाडूंनाही प्रेरणा मिळेल. आम्हाला विश्वास आहे की तो देशाचा अभिमान वाढवेल.’

औरंगाबाद जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या वरिष्ठ सदस्यांनी संतोष बस्नेत यांच्या नियुक्तीचे आणि त्यामुळे शहराला मिळालेल्या अभिमानाचे कौतुक केले. गरुडझेपचे संस्थापक आणि जितो पब्लिश स्कूल मुख्य कार्यकारी संचालक सुरेश सोनवणे, राजेश सातोनकर, विजय सिंगारे, नयन तिवारी, हृषिकेश आपोनारायण, संकेत कुलकर्णी, रुपेश शिंदे, संकेत व्यवहारे, सुनील बस्नेत, कुणाल राठोड, सुरेश जाधव, प्रबीण विश्वकर्मा, अजिंक्य देवरे, अरुण गाडेकर, हुजेफ अत्तार, दीपक भोर, शुभम महाजन, माधवेश श्रीखंडे यांनी संतोष बस्नेत यांचे अभिनंदन करुन भारतीय संघातील खेळाडूंना जागतिक स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news