

Panchayat Samiti has filled the school for teachers
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा: गंगापूर तालुक्यातील वसुसायगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे संतप्त पालक व ग्रामस्थांनी थेट पंचायत समिती कार्यालयातच मशाळाफ भरवत शिक्षण विभागाचे लक्ष वेधले. शुक्रवारी (दि.१०) सकाळी ११ वाजता गंगापूर पंचायत समितीच्या आवारात हे आंदोलन करण्यात आले. शिक्षण विभागाकडून नव्या शिक्षकांच्या नियुक्तीचा लेखी आदेश मिळाल्यानंतर आंदोलन शांततेत दुपारी तीन वाजता मागे घेण्यात आले.
वसुसायगाव शाळेत सध्या १५५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेसाठी मंजूर सात शिक्षक पदांपैकी केवळ तीन शिक्षकच कार्यरत असून, त्यापैकी एकजण जानेवारी २०२५ पासून अनुपस्थित आहे. मुख्याध्यापक पदही रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत होते. या पार्श्वभूमीवर पाच टेम्पोमधून सर्व विद्यार्थी पंचायत समिती कार्यालयात आणण्यात आले आणि तेथेच शिकवणी घेण्यात आली.
महिलांनी खिचडी बनवून या आंदोलनात सहभाग नोंदवला. ङ्गङ्घ आमच्या मुलांचे शिक्षण आमच्या हक्काचे आहे, फ्फ असा ठाम संदेश देत ग्रामस्थांनी शांततामय आणि कल्पक आंदोलनाद्वारे शासनाचे लक्ष वेधले. मुख्याध्यापक पद तात्काळ भरावे. अनुपस्थित शिक्षकांना कार्यमुक्त करावे. प्रतिनियुक्त शिक्षकांऐवजी कायमस्वरूपी शिक्षक नेमावेत.
शाळेला प्रत्यक्ष भेट न देता अहवाल देणाऱ्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर कारवाई करावी या मागण्या आंदोलनातर्फे करण्यात आले होत्या. या आंदोलनाची दखल घेत गटविकास अधिकारी सुहास वाकचौरे, गटशिक्षणाधिकारी अरविंद कापसे, तसेच शिक्षण विस्तार अधिकारी अनिलकुमार सुकदेव यांनी घटनास्थळी भेट देऊन पालकांची व शिक्षकांची माहिती घेतली.
शाळेसाठी सहा नवीन शिक्षक पदे मंजूर करून तात्काळ नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. नव्या शिक्षकांना दुसऱ्याच दिवशी शाळेत रुजू होण्याच्या सूचना देण्यात आल्या. शिक्षकांच्या कमतरतेसारख्या गंभीर प्रश्नावर शांततेत व लोकशाही मार्गान लढा देत ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यात यश मिळवले. या आंदोलनात माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष जाधव, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष नामदेव मोरे, माजी सरपंच सुनील नरोडे, बाबासाहेब ठोकळ, रामहरी नरोडे, ज्ञानेश्वर शेलार आदींसह शेकडो ग्रामस्थ व पालक सहभागी झाले होते.
शाळेला शिक्षक मिळालेच पाहिजेफफ अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी पंचायत समितीच्या आवारात पाच टेम्पोमधून प्रवेश केला. शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेसाठी सहा नवीन शिक्षक पदे मंजूर करून तात्काळ नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. नव्या शिक्षकांना दुसऱ्याच दिवशी शाळेत रुजू होण्याच्या सूचना दिल्याने आंदोलन दुपारी ३ वाजता आंदोलन मागे घेण्यात आले.