छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
शिवसेना उबाठा गटाचे विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे हे बदलापूर घटनेचा निषेध पंतप्रधान मोदी यांच्या समोर नोंदवण्यासाठी विमानतळाकडे जात होते. या दरम्यान विमानतळाच्या मुख्य गेटवरच आज रविवारी (दि.25) सकाळी 10.40 च्या सुमारास त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगांवला जाण्यासाठी येथील विमानतळावर उतरत आहेत. या ठिकाणी ते काही वेळ थांबून मोजक्याच लोकांची भेट घेणार आहेत. याच दरम्यान विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे बदलापूर घटनेचा निषेध करण्यासाठी कार्यकर्त्यांसह तोंडाला काळी पट्टी बांधून विमानतळावर जात असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.