

प्रा. मन्सूर कादरी
सिल्लोड : यंदाच्या हंगामाने शेतकऱ्यांचा चक्क पाण्यात घालवला ! आभाळ फाटल्यासारखा कोसळणाऱ्या पावसाने तालुक्याची आयाबाई को-सळली. पावसाळा सुरू होण्याआधीच मे महिन्यातून सुरू झालेल्या अवकाळी सरींनी गावोगावी नदीड्डूनाले भरून टाकले, पण शेतकऱ्यांचे संसार मात्र ओ-लेचिंब झाले. जून ते ऑक्टोबर पर्यंत सलग पावसाच्या तडाख्याने शेतीचे कंबरडे मोडले आणि हिवाळ्याच्या उंबरठ्यावरसुद्धा हा पाऊस जखमेवर मीठ चोळतोय.
आता ढगफुटी व अतिवृष्टीने बळीर ाजाच्या तोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला. आधीच कर्जाच्या ओझ्याने दबल्यानंतर दोन वेळच्या भाकरीची भ्रांत पडलेला शेतकरी आता हवालदिल झाला आहे. ङ्गङ्घपिकलेलं शेत वाहून गेलं, तर खिशातलं नाणं उडून गेलंफ्फड्डू अशी शोकांतिका अनेक घरांत रंगली आहे.
शेतजमिनी खरडून वाहून गेल्या, पिके पाण्यात गेली, आणि सरकारी पंचनामे फक्त कागदांवरच झाले. मदतीच्या घोषणा झाल्या, पण मदत मात्र कधी मिळणार याचं कुणालाच उत्तर नाही. भराडी, आमठाणा, अंभई, बोरगाव बाजार, वांगी बुद्रुक, उपळी, पिरोळा, देऊळगाव बाजार, चारनेर, डोईफोडा, खातखेडा, अजिंठा, धानोरा, वांजोळा, गोळेगाव, पेंडगाव, केळगाव अशा गावागावात शेतकऱ्यांचे स्वप्न उद्ध्वस्त झाले आहे. तालुक्यातील तब्बल ८५ आधार शेतकऱ्यांची ८५ हजारांहून अधिक हेक्टर वरील पिके वाहून गेली, तर ७० ते ७५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा सरकारी अंदाज आहे.
मक्याच्या कणसांवर अंकुर फुटले, अद्रक सडली, कपाशीच्या बोंड्या उघड्या पडल्या, तर मजूरअभावी वेचणी थांबली आहे. लक्ष्मीची पावलं घेऊन येणारी दिवाळी यंदा बळीराजासाठी ङ्गङ्घ अंधारातली अमावास्याफ्फ ठरली. गोडधोड तर दूरच, घरात भाकर भाजायलाही धान्य नाही. शहरात आकाशात रॉकेटच्या प्रकाशझोतांनी झगमगाट सुरू असताना, ग्रामीण भागात मात्र ङ्गङ्घदुःखाचे काळेकुट्ट सावटफ्फ पसरले होते. ङ्गङ्घशेतीत पाणी, घरात अश्रूफ्फ या एका वाक्यात यंदाच्या दिवाळीचे सार गुंफले गेले.
शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा
सरकारकडून मदतीच्या घोषणा होऊनही शेतकऱ्यांच्या ओंजळीत अजूनही काहीच पडलेले नाही. पिकल्यावर पाऊस आणि मदतीपूर्वी आश्वासनेफ्फया दुष्टचक्रात बळीर-ाजा अडकून पडला आहे. काहींच्या घरात जनावरांना चारा नाही, काहींना मुलांच्या फीची चिंता, तर काहींना कर्जदारांचे फोन ! पावसाने झोप उडवली आणि सरकारच्या उदासीनतेने उरलेला आत्मविश्वास गेला. बळीराजा केवळ मदतीची नाही, तर जगण्याची आस धरून बसला आहे.