वैजापूर : दोन दुचाकीची समोर- समोर धडक झाली. या अपघातात एका ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. तर, सोबत असणारे दोन नातवंडे जखमी झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील आलापुरवाडी येथून जांबरगाव येथे नातीला सोडण्यासाठी वैजापूरच्या दिशेने जात असताना वैजापूर ते खंडाळा रोडवर असणाऱ्या भारत पेट्रोलियमच्या समोरून आलेल्या दुचाकी स्वराने जोराची धडक दिली. या धडकेत चालक नारायण जाधव हे हवेत फेकले गेले. त्यानंतर रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तर दोन लहान मुले जखमी झाले. अपघातानंतर तात्काळ त्यांना वैजापूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तेथील डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्यांना खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. या अपघात दोन लहान मुले जखमी आहेत.