

पिंपळदरी : सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी येथील रहिवासी ऋतिक सुनील अंभोरे (वय 22) या तरुणाने राहत्या घरात निळ्या कलरच्या साडीला गळफास घेऊन मंगळवारी चार वाजता आपले जीवन संपवले. जीवन संपवण्याचे नेमके कारण अध्याप कळू शकले नाही.
घटनेची माहिती मिळताच अजिंठा पोलीस स्टेशनने घटनास्थळी येऊन पंचनामा केला. त्याला खाली उतरवून अजिंठा येथील उपरुग्णालय घाटी येथे पंचनाम्यासाठी देण्यात आले.
अजिंठा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास अजिंठा पोलीस स्टेशनचे निरीक्षक अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष पाईकवार, रवींद्र बागुलकर हे करीत आहे.