वैजापूर : शहरातील जिल्हा सत्र न्यायालयासमोर रोटेगाव रोडच्या दिशेने जाणाऱ्या चारचाकी चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात घडला. या अपघातात सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.४) रात्री नऊच्या दरम्यान वैजापूर शहरातील जिल्हा सत्र न्यायालयाच्या गेट समोर असणाऱ्या डिव्हायडरवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडून रोटेगाव रोडच्या दिशेने येणाऱ्या चारचाकी चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार डिव्हायडला धडकली. या अपघातामध्ये सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. या अपघात बशीर पठाण (४८), रेहानाबी पठाण ३८), अरबाज पठाण (२३), शकीला बी युनूस पठाण (४५), आयशा बी गुलाब पठाण (५०) तयाबी कैसर पठाण, )सर्व रा. अमळनेर ता. गंगापूर) अशी जखमींचे नावे आहेत.