सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : सराटी येथील रेशन दुकानदार सुंदर गंजीधर गुळवे यांनी पोलिस पाटील पदाचा गैरवापर करीत नागरिकांना रेशनबाबत संपूर्ण माहिती देत नाही. त्यामुळे अर्धे गाव रेशन पासुन तसेच शेतकरी मोबदला मिळवून देण्यापासून वंचित आहे. याबात तहसिल कार्यालयात चकरा मारुनही संबंधित अधिकाऱ्यांकडून टोलवा टोलवीची उत्तरे दिली जात असुन अनेक वर्षांपासून शासनाच्या रेशनचा नागरिकांना लाभ मिळत नसल्याने नाागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
सिल्लोड तालुक्यातील सराटी येथील जवळपास अर्ध्या गावातील नागरिकांना दोन वर्षांपासून रेशन पासुन वंचित ठेवण्यात आले आहे. येथील रेशन दुकानदार तथा पोलिस पाटील सुंदर गंजीधर गुळवे हे शासनाकडून आलेल्या रेशनविषयी वेळेवर माहिती देत नाहीत.
उलट विचारपूस करणाऱ्या रेशनकार्ड धारकांना उर्मटपणे बोलून विषय मारुन नेतात. गेल्या अनेक महिन्यांपासून संबंधित धुकानदार रेशनकार्ड धारकांना जाणुन बुजून वंचित ठेवण्याचे काम करीत आहे.
या संदर्भात नागरिक वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तहसील कार्यालयात चकरा मारत आहेत. परंतू तिथेही अधिकारी उत्तरे देण्यास टाळाटाळ करीत असून रेशन दुकानदाराला पाठिशी घातल आहेत. तहसील कार्यालयाचे उंबरटे झिझवूनही अधिकाऱ्यांकडून समाधानकार उत्तरे मिळत नसल्याने नागरिकांना थेट उपोषणाचा इशारा दिला आहे. या आशयाचे नुकतेच तहसील कार्यालयाला निवेदन दिले आहे.
स्थानिक शिधापत्रिकाधारक ग्रामस्थ रेशन दुकानदाराच्या बेजबाबदार पणाच्या वागणूकीने अनेक वर्षांपासून स्वस्त धान्याच्या लाभापासून पासुन वंचित आहेत. मागील कालावधीतील आर्थिक मोबदला लाभार्थ्यांना देण्यात यावा. तसेच शिधापत्रिकाधारक लाभार्थी धान्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. नसता पुरवठा विभागाच्या विरोधात उपोषण करण्यात येईल. असा इशारा निवेदनाद्वारे सांडु घायवट, शिवाजी घायवट, शिवाजी शेळके, माणिकराव नरवाडे, भिका घायवट, रामराव नरवाडे, विष्णु काळे यांच्यासह ग्रामस्थांकडून देण्यात आले आहे.