हतनूर, पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील हतनूर शिवारातील विहिरीत पडलेल्या बिबट्याला प्रादेशिक वन विभागाच्या रेस्क्यू टिमने सुखरूप बाहेर काढले असून बिबट्यास सद्या उपचारकामी पशुवैदयकिय अधिकारी यांच्या निगराणीत ठेवण्यात आले आहे.
कन्नड तालुक्यातील वनपरिक्षेत्र अंतर्गत नियतक्षेत्रातील हतनूर शिव- ारातील गट क्रमांक ४८ मधील शेतकरी संजय लोखंडे यांच्या विहिरीत वन्य प्राणी बिबट्या (मादी) पडल्याची माहिती प्रादेशिक वन विभागास स्थानिक शेतकऱ्यांनी दिली. माहिती मिळताच छत्रपती संभाजीनगर उपवनसंरक्ष सुर्वणा माने, सहाय्यक वन संरक्षक संकपाळ, कन्नड वन परिक्षेत्र अधिकारी रोहिणी सांळुखे, वन अधिकारी के. आर. जाधव, वनरक्षक उज्वला सोनवणे, साळवे, डि. एस पवार, गायकवाड, नागरगोजे वन कर्मचारी ए. डी. आव्हाड यांनी घटनास्थळी दाखल होऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली.
बिबट्याला विहिरीतून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी उपलब्ध साधनसामग्रीचा उपयोग करत पिंजरा सोडून विवट्याला अलगदरित्या पिंजर्यात घेण्यात आले. व त्यास सुखरुप बाहेर काढले. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी यांचे निगराणीत संपूर्ण मोहीमेत वन्यप्राणी बिबटयास कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही याबाबत विशेष दक्षता घेण्यात आली.
सदर बिबट्यास मक्रणपूर येथे पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या निगराणीत प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली. बिबट्या ठणठणीत असल्याची खात्री केल्यानंतर त्यास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.