पैठण; पुढारी वृत्तसेवा : ओबीसी आंदोलन उपोषणकर्ते लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांना पाठिंबा देण्यासाठी पैठण येथील सह्याद्री चौकात गुरुवारी पैठण तालुका सकल ओबीसी समाज व अ.भा. महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांनी वडीगोद्री येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर रोडवरील सह्याद्री चौकात ओबीसी समाजाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको केला. यावेळी माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी, कल्याण रंधे, विजय ठाणगे, सोमनाथ जाधव, बिडकीन सरपंच धर्म, आप्पासाहेब सोलाट, सचिन भाग्यवंत, महादेव ठोके, जगन्नाथ जमादार यांच्यासह अखिल भारतीय समता परिषदेचे देविदास सोनवणे, प्रकाश दिलवाले, राजेंद्र तुपसेदर, प्रशांत आव्हाड आंदोलनात सहभाग झाले होते. मंडळ अधिकारी कल्पना शेळके, तलाठी दिलीप बाविस्कर यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
हेही वाचा :