करवीर पिठाचे शंकराचार्य विद्या नरसिंह स्वामी यांनी घेतले ज्योतिर्लिंग प्रभु वैद्यनाथचे दर्शन

वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टकडून यावेळी त्‍यांचा सत्‍कार करण्यात आला
Vidya Narasimha Swamy, Shankaracharya of Karveer Pitha take darshan of Jyotirlinga Prabhu Vaidyanath
करवीर पिठाचे शंकराचार्य विद्या नरसिंह स्वामी यांनी घेतले ज्योतिर्लिंग प्रभु वैद्यनाथचे दर्शनFile Photo
Published on
Updated on

परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा

करवीर पीठ कोल्हापूरचे श्रीमत् जगद्गुरु शंकराचार्य विद्या नरसिंह स्वामी महाराज यांनी आज बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग प्रभु वैद्यनाथाची मनोभावे पूजा करून दर्शन घेतले.

भारतातील प्रमुख चार शंकराचार्य पिठांपैकी श्रृंगेरी पिठाचे उपपीठ म्हणून ख्याती असलेल्या कोल्हापूर येथील करवीर पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य विद्या नरसिंह स्वामी महाराज हे मराठवाड्यात आले होते. त्यांनी परळी वैजनाथ येथे येऊन बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाची मनोभावे पूजा केली व दर्शन घेतले. यावेळी वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने विश्वस्त प्रा. प्रदीप देशमुख, विजयकुमार मेनकुदळे, अनिल तांदळे आदींनी त्यांचे वैद्यनाथाची प्रतिमा देऊन स्वागत व सत्कार केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news