पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा
बीड तालुक्यातील पिंपळनेर रस्त्यावर अंतरवन पिंपरी तांडा नजीक तलावाजवळ रस्त्यावर समोरासमोर मोटरसायकलची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात एका मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
दुसऱ्या मोटारसायकलस्वाराने अपघात होताच त्या ठिकाणाहून पळ काढल्याची माहिती पिंपळनेर पोलीसांनी दिली. सदरील अपघातातील मृत माजी सरपंच असल्याचे प्रथमदर्शनी सांगितले आहे. घटनास्थळी पिंपळनेर पोलिसांनी पाहणी करून पंचनामा केला आहे.