Manjra Dam : मांजरा धरणाचे दोन दरवाजे उघडले !

मांजरा प्रकल्प ९६.०५% भरला, धरणाचे २ दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग
Two doors of Manjra Dam opened!
मांजरा धरणाचे दोन दरवाजे उघडले !File Photo
Published on
Updated on

गौतम बचुटे /केज

बीड जिल्ह्यातील मांजरा प्रकल्प ९६.०५% भरला असल्याने दोन दरवाजे उघडून सांडव्यातून पाण्याच्या विसर्ग सुरू करण्यात आला आहे. (Manjra Dam)

दि.२५ सप्टेंबर रोजी सकाळी १०:०० वाजता मांजरा प्रकल्प ९६.०५% क्षमतेने भरला आहे. पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे धरणात होणारी पाण्याची आवक पाहता धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने आज दि. २५ सप्टेंबर रोजी १२:३० वाजता मांजरा प्रकल्पाचे २ वक्रद्वारे ०.२५ मीटर उंचीने उघडून मांजरा नदीपात्रात १७३ क्यूसेक्स (४९.०० क्यूमेक्स ) इतका विसर्ग सोडण्यात आला आहे.

धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. त्‍यामुळे मांजरा नदी काठावरील पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी सतर्क रहावे. कोणीही नदीपात्रात प्रवेश करू नये. कुठलीही जिवीत अथवा वित्त हानी होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news