गेवराई पुढारी वृत्तसेवा : गेवराई येथील हिंगणगाव गोदावरी नदीमध्ये वाळूउपसा करणाऱ्या तीन संशयितांना बीड गुन्हा शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यासोबतच वाळू उपसा करणाऱ्या यंत्रासह, ट्रॅक्टर असा 15 लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे.
गेवराई तालुक्यातील गोदावरी पात्र हे अवैध वाळू उपसाचे कुरण होऊन बसले आहे. मात्र, गेवराईचे पोलिस प्रशासन आणि महसूल प्रशासनाला याची खबरबात न लागता. बीडचे स्थानिक गुन्हा शाखेकडून शनिवारी (ता.२१) दुपारी चार वाजता हिंगणगाव परिसरात छापा टाकून अवैध उपसा करणा-या तीन केन्या व ट्रॅक्टरसह साधारण १५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, अवैध वाळूची वाहतूक करणारे तीन जण पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
याबाबत गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तीन जण पोलीसांनी ताब्यात घेतले आहेत. सदरील कारवाई गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख, फौजदार ए.एस.मुरकुटे,पोलीस हवालदार ठोबंरे अदीने केली आहे.याच महिन्यात बीडच्या गुन्हा शाखेकडून गेवराईतील वाळूच्या संदर्भातील तीसरी कारवाई आहे.