केज तालुक्यातील हजारो हेक्टरवरील कांदा जाळधुईने करपला

कांदा उत्पादक शेतकरी संकटात,लाखोचे नुकसान
Thousands of hectares of onion in Kage taluka were cut by netting
केज तालुक्यातील हजारो हेक्टरवरील कांदा जाळधुईने करपला Pudhari Photo
Published on
Updated on

नेकनूर, मनोज गव्हाणे : आठवडाभर सातत्याने सकाळी पडणाऱ्या धुईने नेकनूर परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून हजारो हेक्टरवरील कांदा पीक धोक्यात आले आहे. फवारणी करुनही कांदा उभारी घेण्याची शक्यता नसल्याने यावर नांगर फिरवण्याचा सूर शेतकऱ्यांतुन व्यक्त होत आहे. भाव वाढल्याने यावर्षी उत्पादन क्षेत्र वाढले असताना शेतकऱ्यांसमोर आठवडाभरातील धुईने संकट ओढावले आहे.

Thousands of hectares of onion in Kage taluka were cut by netting
Onion Theft | सीसीटीव्ही तोडून थेट व्यापाऱ्याच्या खळ्यातून कांदा चोरी

केज तालुक्यातील नेकनूर परिसरात असणारी बहुतांश गावे कांदा उत्पादक म्हणून ओळखली जातात. यामध्ये नेकनूर, सावंतवाडी, बाळापूर, आंबील, वडगाव, कुंभारी, चाकरवाडी, बंदेवादी, वैतागवाडी, सफेपुर ,जैताळवाडी, धावज्याचीवाडी, पांढऱ्याचीवाडी, तांदळयाचीवाडी, नारेवाडी, मुंडेवाडी, वाघेभाबळगाव आदी परिसरातील गावांमध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात कांदा पिकवला जातो. मागील दोन महिन्यांच्या कालावधीत लागवड झालेल्या हजारो हेक्टरवरील कांद्याला जाळ धुईने घेऱ्यात घेतले, त्यामुळे जोमदार दिसणारे कांदा पीक करपले लागोपाठ रोजच आठवडाभर आलेली धुईरुपी विघ्न शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी टाकणारे ठरले. आवश्यक असलेली फवारणी करूनही पाहिजे तेवढा फरक नसल्याने आता यावर नांगर फिरवावा लागेल या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. एलोरा वडर, फुरसुंगी, बसमत 780 अशा विविध जातीचे बियाणे ते रोप विक्रीचा व्यवसाय या भागात मागच्या दीड ,दोन महिन्याच्या काळात वेग धरून असतो. कांद्याने चाळीस रुपयांचा टप्पा पार केल्याने यावर्षी रोपांनी चांगलाच भाव खाल्ला लागवडीचा खर्च वाढला मात्र आठवड्याच्या जाळधुईने शेतकऱ्याचे सगळे गणितच बिघडून टाकले मोठा खर्च करूनही पीक वाया जात असल्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

Thousands of hectares of onion in Kage taluka were cut by netting
Onion News Nashik | कांदा निर्यातीतून तीन महिन्यांत ७४४ कोटींचा व्यवसाय
लागवड केलेल्या कांद्याला दीड महिन्याचा कालावधी पूर्ण होत असताना आठवड्यात आलेली धुई जोमातील पिकाचे नुकसान करणारी ठरली कांदा करपून गेला आहे. एक्करी बाराशे ते पंधराशे रुपयांचे औषधे फवारणी केली, तरी परिस्थिती सुधारली नाही. लागवडीपासून आतापर्यंत मोठा खर्च झालेला आहे. तो कसा भरून निघणार हा प्रश्न पडला आहे.
श्रीराम मुंडे, कांदा उत्पादक शेतकरी, मुंडेवाडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news