गौतम बचुटे/केज
गुजरात राज्यातून केज मार्गे हैद्राबादकडे जात असताना कोरेगाव पाटीजवळ चालत्या टेंम्पो मधून अज्ञात इसमाने ताडपत्री फाडून आतील एक लाख रूपयांचे तयार कपड्याचे बॉक्स चोरट्याने पळविले.
या विषयी अधिक माहिती अशी की, लातूर जिल्ह्यातील विक्रम कमलाकर कांबळे हे आयशर टेम्पो क्र (एम एच-२४/ए यू-९४४१) दि. २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६:०० वाजण्याच्या सुमारास गुजरात राज्यातील वापी येथुन तयार कपड्याचे बॉक्स भरुन हैद्राबादकडे जात होते.
दि. २५ ऑगस्ट रोजी पहाटे ५:०० वाजण्याच्या सुमारास ते व सोबत क्लिनर म्हणून असलेला सतीश देशमाने हे केज मार्गे हैदराबादकडे जात असतांना कोरेगाव पाटीच्या जवळुन त्यांची गाडी पुढे टोल नाक्याजवळ आली असता. त्या वेळी सकाळी ६:०० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पाठीमागुन आलेला एक ट्रक त्यांना ओव्हरटेक करुन जात असतांना त्या ट्रक ड्रायव्हरने सांगीतले की, एक अनोळखी व्यक्ती ट्रकमधील बॉक्स खाली टाकीत आहे. त्या नंतर त्याने गाडी थांबवली. तोपर्यंत गाडीतील चोरी करणारा इसम तेथुन पळुन गेला. त्या ट्रक मधील १ लाख रुपयांचे तयार शर्ट व पँटचे बॉक्स चोरीला गेले आहेत.
दरम्यान विक्रम कांबळे यांच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश बनसोडे हे या घटनेचा तपास करीत आहेत.