बीड : दिंद्रुड येथील उपोषणामधील एकाची प्रकृती खालावली

व्यापाऱ्यांनी दुसऱ्या दिवशीही ठेवली बाजारपेठ कडकडीत बंद; प्रशासन गांभीर्याने घ्यावे
Beed Protest
दिंद्रुड येथे उपोषणाला बसलेले आंदोलकPudhari Photo
Published on
Updated on

माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील निजामकालीन आठवडी बाजार तळावर कब्रस्तानच्या माध्यमातून होत असलेले, अतिक्रमण हटवण्यासाठी व फेरफार रद्द करण्याच्या मागणीसाठी स्वातंत्र्यदिनापासून उपोषण सुरु आहे. आज रविवारी चौथा दिवस असून एक जणांची प्रकृती खालावली आहे. माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड ची सर्वांत मोठी असलेली बाजारपेठ दुसऱ्या दिवशीही कडकडीत बंद ठेवण्यात आली. मात्र याकडे जिल्हा प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे.

Beed Protest
केज तहसील कार्यालयासमोर शिवसेनेचे आमरण उपोषण सुरू

ग्रामस्थ तथा व्यापारी संजय शिंदे, सुखदेव कटारे, बाबा कांबळे यांच्यासह अनेक जण उपोषणास बसले आहेत. यामध्ये बाबा कांबळे या तरुणाच्या शरीरातील पेशी कमी झाल्या असून अंगात ताप आहे‌. त्यामुळे या तरुणाची प्रकृती अत्यंत खालवली असून, प्रकृती तपासणीसाठी आलेल्या पात्रुड व दिंद्रुड येथील शासकीय आरोग्य अधिकारी यांना सर्वं उपोषणकर्त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. येथील जुने बस स्थानक परिसरात १५ ऑगस्ट गुरुवार पासून चालू असलेल्या आमरण उपोषणाला ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील व्यापाऱ्यांनी बेमुदत बाजारपेठ कडकडीत बंद ठेवणार असल्याचे निवेदन महसूल व पोलीस प्रशासनाला दिले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news