नगर-सोलापूर रस्त्यावरील अपघातात अंभोरा येथील २ तरुण जागीच ठार

कंटेनरची दुचाकीला जोराची धडक
 नगर-सोलापूर रस्त्यावरील अपघातात राजेश  थोरात व शेखर मिसाळ यांचा जागीच मृत्यू झाला.
नगर-सोलापूर रस्त्यावरील अपघातात राजेश थोरात व शेखर मिसाळ यांचा जागीच मृत्यू झाला. Pudhari News Network
Published on
Updated on

आष्टी, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील अंभोरा गावातील दोन युवक घोगरगाव येथे कामानिमित्त मोटार सायकलवरून जात असताना पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. हा अपघात नगर -सोलापूर रोडवर आज (दि.८) झाला. या अपघातात राजेश बबन थोरात (वय २८) व शेखर नवनाथ मिसाळ ( वय ३४) यांचा जागीच मृत्यू झाला.

 नगर-सोलापूर रस्त्यावरील अपघातात राजेश  थोरात व शेखर मिसाळ यांचा जागीच मृत्यू झाला.
बीड : नेकनूर पोलिसांनी थरारक पाठलाग करून सहाजणांना केले जेरबंद

राजेश बबन थोरात यांच्या पाठीमागे वडील एक भाऊ असा परिवार आहे. तर शेखर मिसाळ यांच्या पाठीमागे आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news