मांजरा प्रकल्प ९५% भरला; नदीकाठच्या गावांना इशारा!

मांजरा प्रकल्प ९५% भरला; नदीकाठच्या गावांना इशारा!
मांजरा प्रकल्प ९५% भरला; नदीकाठच्या गावांना इशारा!
File Photo
Published on
Updated on

केज : बीड जिल्ह्यातील मांजरा प्रकल्प ९५%भरले असल्याने कोणत्याही वेळी पाणी सांडव्यातून सोडून विसर्गाची शक्यता असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आज (दि.२५) सकाळी ठीक ६:०० वा. मांजरा प्रकल्प ९५.०५% क्षमतेने भरला असून पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे धरण कोणत्याही क्षणी पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे धरण क्षेत्रात होणारी पाण्याची आवक पाहता मांजरा धरणाच्या सांडव्याद्वारे मांजरा नदी पात्रात कोणत्याही क्षणी विसर्ग सुरू करण्यात येणार आहे.

तसेच धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल. तरी मांजरा नदी काठावरील पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी सतर्क रहावे. कोणीही मांजरा नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठलीही जिवीत अथवा वित्त हानी होणार नाही. याची खबरदारी घ्यावी. अशी माहिती प्रशासनाच्या वतीने.देण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news