केज तहसील कार्यालयासमोर शिवसेनेचे आमरण उपोषण सुरू

अवैध धंद्यांविरोधात शिवसैनिक आक्रमक
Shivsena hunger-strike
शिवसेना केज तालुका प्रमुख अशोक जाधव आमरण उपोषणाला बसले आहेत.Pudhari News Network
Published on
Updated on

केज: केज तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यात यावेत, या मागणीसाठी केज तालुका शिवसेनेचे तालुका प्रमुख अशोक जाधव आजपासून (दि. ८) आमरण उपोषणाला बसले आहेत.

Shivsena hunger-strike
बीड : नेकनूर पोलिसांनी थरारक पाठलाग करून सहाजणांना केले जेरबंद

केज आणि युसुफवडगाव मध्ये अवैध धंद्याचे जाळे

केज तालुक्यातील केज आणि युसुफवडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्याचे जाळे मोठ्या प्रमाणात फोफावले आहे. तालुक्यात गुटखा, मटका, गोवंशीय प्राण्याची अवैध वाहतूक, दारू विक्री, वाळू उपसा, चंदन तस्करी, ऑनलाईन चक्री, गांजा विक्री यासारखे अनेक धंदे राजरोसपणे सुरू आहेत. प्रशासन त्याकडे डोळे झाक करीत आहे. त्यामुळे कित्येकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कित्येकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत.

Shivsena hunger-strike
बीड : पोलीस दलात झेपावले राखेच्या तळ्याशेजारील 'दोन फिनिक्स'!

ठाकरे शिवसेनेच्या वतीने आमरण उपोषणाला सुरूवात

अवैध धंदे तत्काळ बंद करण्यात यावेत, या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. शिवसेना तालुका प्रमुख अशोक जाधव यांच्यासह रोहित कसबे, तात्या रोडे, सुभाष ठोंबरे, किशोर घुले, ज्ञानेश्वर बोबडे, आप्पा कांबळे, ऋषी घुले, अशोक कोल्हे, सखाराम वायबसे, बाबासाहेब देशमुख, आप्पा कांबळे, पुरुषोत्तम देशमुख आदी कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news